शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

ठिकठिकाणी कोट्यवधी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2016 05:34 IST

मोहिमेदरम्यान कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले आहेत.

मुंबई : चलनातून ५०० व १०००च्या नोटा रद्द केल्याच्या तसेच स्थानिय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात ठिकठिकाणी तपासणी मोहीम सुरू आहे. याच मोहिमेदरम्यान कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले आहेत.विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा आणि अकोला जिल्ह्यात गुरुवारी एकूण २ कोटी २३ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडमध्ये एक कोटी ७७ लाख रुपये ताब्यात घेण्यात आले असून ही रक्कम माहूर आणि नांदेड येथील बँकांची असल्याचे पुढे आले आहे. माहूरहून नांदेडकडे जाणाऱ्या एका वाहनात एक कोटी २४ लाख रुपये आढळले. त्यानंतर अन्य एका वाहनाची तपासणी करताना ५३ लाख रुपये सापडले. चंद्रपूरच्या सिंदेवाही येथे निवडणूक पथकाने दुपारी एका गाडीतून ३० लाखांची रोकड जप्त केली. यात ५०० व १००० च्या नोटांचा समावेश असून पोलिसांनी दोघांना अटक केली. उशिरापर्यंत रोकड नेमकी कुणाची, हे स्पष्ट झाले नव्हते.वर्ध्यात नाकेबंदी दरम्यान आर्वी पोलिसांनी एका कारमधून ५०० व १००० च्या पाच लाखांच्या नोटा जप्त केल्या.ही पाच लाखांची रोकड असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तर, अकोल्याच्या आकोट येथे नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी एका व्यक्तीकडून ४ लाख ३० हजार रुपयांची रक्कम जप्त केली; परंतु याप्रकरणी कोणताही गुन्हा आकोट शहर पोलिसांत दाखल नाही. गोंदिया जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी वाहन तपासणीदरम्यान रोकड जप्त करण्यात आली.सालेकसा आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यात केलेल्या या कारवाईत सात लाख रुपये जप्त करण्यात आले.अर्जुनीकडून गडचिरोलीकडे अ‍ॅम्बेसेडर कारने येणाऱ्या गडचिरोली येथील जीवनकुमार बाट यांच्याकडे २ लाख ५ हजार रुपये आढळून आले.  या नोटा गोंदिया कोषागार कार्यालयात जमा करण्यात आल्या. (लोकमत न्जूज नेटवर्क)