शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मच्छीमार सहकारी संस्थांमधून कोट्यवधींचा भ्रष्टाचार

By admin | Updated: July 14, 2016 20:19 IST

राज्यातील गोड्या पाण्याच्या बंद पडलेल्या १४ मच्छीमार सहकारी संस्थांच्या माध्यमातून ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केला आहे.

- एसआयटीमार्फत चौकशीची मागणी

मुंबई : राज्यातील गोड्या पाण्याच्या बंद पडलेल्या १४ मच्छीमार सहकारी संस्थांच्या माध्यमातून ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केला आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी विशेष तपास समितीमार्फत करावी, अशी मागणीही कृती समितीचे अध्यक्ष दामोदार तांडेल यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केली आहे.मस्त्य आयुक्तालयात काही अधिकारी एकाच जागेवर गेल्या १५ वर्षांपासून कार्यरत असल्याचा दावा तांडेल यांनी केला आहे. या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचारात समावेश असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे बंद पडलेल्या मच्छीमार सहकारी संस्थांसोबत संबंधित अधिकाऱ्यांचीही एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.भ्रष्टाचार झालेल्या संस्थांमध्ये राजमाता विकास मच्छिमार सहकारी संस्थेवर तांडेल यांनी गंभीर आरोप केले आहेत. तांडेल यांनी सांगितले की, एन.सी.डी.सी. योजनेतून संस्थेला ३० मार्च २००९ रोजी बर्फ कारखाना आणि शीतगृह उभारण्यासाठी ३ कोटी ४२ लाख रुपये निधी मिळाला होता. मात्र निधी मिळाल्यानंतर संस्थेने बर्फ कारखाना आणि शीतगृह उभारलेच नाही. यासंस्थेच्या ३० मासेमारी यांत्रिक नौकांना प्रत्येकी ३९ लाख ४७ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता. २००६-०७ दरम्यान संस्थेला संपूर्ण निधी मिळाला. मात्र निधी मिळाल्याच्या ९ वर्षांनंतरही नौका बांधलेल्या नाहीत. याप्रकरणात एकूण ११ कोटी ८४ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोपही तांडेल यांनी केला आहे.आंदोलन करणार...मस्त्य विभागात शेकडो कोटींचा भ्रष्टाचार असून लवकरच तो बाहेर काढणार असल्याचा दावाही तांडेल यांनी केला आहे. शनिवारी समितीची बैठक पार पडणार असून सरकारने तत्काळ दखल घेतली नाही, तर २७ जुलैला आझाद मैदानात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.