शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
2
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
3
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
4
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
5
त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव
6
Jeans Ban : जीन्स घालून 'या' देशात फिराल, तर थेट तुरुंगात जाल! कोणत्या देशात आहे हा नियम?
7
७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?
8
१७,००० चा AI प्रोग्राम एअरटेल देणार मोफत! काय आहे पर्प्लेक्सिटी AI? फायदे वाचून थक्क व्हाल!
9
डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी
10
बायकोशी कडाक्याचं भांडण झालं, नवरा रागाच्या भरात तडक चालत निघाला-पाहा कुठं पोहचला... 
11
Patna Hospital Firing: रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ
12
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
13
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
14
हिंदू बनून फसवलं, सौदीत विकण्याचा डाव, धर्म बदलला नाही म्हणून गँगरेप; पीडितेने सांगितला थरारक प्रसंग
15
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
16
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
17
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
18
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
20
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”

टीका करा; पण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या

By admin | Updated: May 1, 2017 04:31 IST

महाराष्ट्रात विरोधकांचा सन्मान राखण्याची परंपरा असताना, विरोधकांबद्दल ‘कोडगे’ आणि ‘निर्लज्ज’ असे शब्द वापरून मुख्यमंत्र्यांना आनंद

मुंबई : महाराष्ट्रात विरोधकांचा सन्मान राखण्याची परंपरा असताना, विरोधकांबद्दल ‘कोडगे’ आणि ‘निर्लज्ज’ असे शब्द वापरून मुख्यमंत्र्यांना आनंद मिळत असेल, तर आमची हरकत नाही. आमच्याबद्दल काहीही वाईट बोला, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या,  असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण पत्रकारांशी बोलताना केले.चिंचवड येथील भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या संघर्ष यात्रेवर टीका करताना, विरोधकांबद्दल ‘कोडगे’ आणि ‘निर्लज्ज’ असे असंसदीय शब्द वापरले होते. त्यावर खा. चव्हाण म्हणाले, ‘गेल्या ५७ वर्षांच्या इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्याने विरोधकांबद्दल अशी असंसदीय भाषा वापरली नाही. फडणवीस यांना असे शब्द वापरून आनंद मिळत असेल, तर त्यांच्याकडून यापेक्षा वाईट शब्द ऐकण्याची आमची तयारी आहे. राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. गेल्या अडीच वर्षात साडेनऊ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. एकाही शेतमालाला हमीभाव मिळत नाही.’ राज्यात तूर उत्पादक शेतकरी गेल्या कित्येक दिवसांपासून घरदार सोडून खरेदी केंद्राबाहेर रांगेत उभा आहे. शेतकऱ्यांची इतकी  वाईट परिस्थिती असताना,  मुख्यमंत्री मूग गिळून गप्प बसले आहेत. (विशेष प्रतिनिधी)शेवटचा दाणा खरेदी होईपर्यंत तूर खरेदी केंद्र सुरू राहतील, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता. तुमच्या शब्दावर विश्वास ठेवणाऱ्या शेतकऱ्यांची फसगत झाली आहे. तेव्हा शेतकऱ्यांची सर्व तूर खरेदी करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, - खा. अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष