शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याची पातळी कमी झाल्याने गावावर संकट

By admin | Updated: April 8, 2017 01:52 IST

निरनिमगावात पिण्याच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने गावावर बिकट संकट आल्याचे चित्र निर्माण झाले

नीरा-नृसिंहपूर : निरनिमगावात पिण्याच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने गावावर बिकट संकट आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जनावरांना पिण्यासाठी पाणी न मिळाल्याने गावात जवळपास ७ शेळ्यांचा पाण्यावाचून तडफडून मृत्यू झाल्याचे वास्तव आहे.पाण्याअभावी रखमाबाई सोपान वाघमोडे यांच्या दोन शेळ्यांचा तडफडून मृत्यू झाला. तसेच, बाबासो हेगडे यांच्या तीन शेळ्यांचा व सेसाबाई मजगे यांच्या दोन शेळ्यांचा उन्हाची तीव्रता वाढल्याने पिण्यास पाणी न मिळाल्याने तडफडून मृत्यू झाला. या मृत्यू झालेल्या शेळ्यांची कुठल्याही प्रकारची खबरदारी व पंचनामा न केल्याचे दिसून आले आहे. प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घेतली नाही, अशी माहिती या शेळीमालकांनी दिली. ही माहिती समजताच माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी निरनिमगावला भेट दिली. शेळीमालकांना भेट देऊन त्यांना नुकसानभरपाईसाठी आर्थिक मदत केली. तसेच, तातडीने गावामध्ये पाण्याचा टँकर चालू करण्याचे आश्वासन दिले. या वेळेस त्यांनी नीरानदीचे पाहणी केली. निरा नदी कोरडी पडल्याने गावातील लोकांवर बिकट दिवस आले आहेत. तसेच जनावरांना चाऱ्याचे हाल चालले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी पाटील यांच्याकडे व नीरा नदीवर मिनी बंधारा बांधण्यासाठी मागणी केली आहे. या वेळी मनोज पाटील, प्रताप पाटील, तलाठी, एस. टी. यादव, ग्रामसेवक आंबिका पावसे, काशिनाथ पवार, बापू महानवर, रघुनाथ पाटील, लालासो महानवर, रामचंद्र जाधव, अजय पाटील, गोळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. उन्हाची तीव्रता वाढल्याने सर्व बोर, विहिरी, तलाव, आड यांचे पाणी आटले आहे. दोन ते तीन किलोमीटरवरून महिला व लहान मुलांना पायपीट करून व जीव धोक्यात घालून विहिरीतून ७० ते ८० फुटांवरून पाणी काढावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर व जनावरांना चाऱ्यासाठी छावण्या चालू करण्याची ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.तसेच, इंदापूर तालुक्यात पाणीटंचाईमुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीरतेने भेडसावत आहे. नीरा डावा, खडकवासला कालव्यातून पाणी सोडून नीरा नदीवरील बंधारे भरण्याची मागणी पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली. (वार्ताहर)