मुंबई : महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना खडसेंनी नोटीस बजावली आहे. कोणत्याही पुराव्याशिवाय आणि शहानिशा न करता आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. या आरोपांबाबत खुलासा करून माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे, असे नोटिसीत म्हटले आहे. अंजली दमानिया यांनी मंत्री खडसे यांच्याविरोधात आरोप केले होते. त्यावर खडसे यांनी पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले होते. मात्र पुरावे सादर न झाल्याने खडसे यांनी अॅड. महेश जेठमलानी यांच्यामार्फत दमानिया यांना शुक्रवारी नोटीस बजावली. या नोटिसीमध्ये आरोपांविषयी खुलासा करून माफी मागण्याची मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
दमानियांना खडसेंची नोटीस
By admin | Updated: May 21, 2016 05:36 IST