पुणे : रूपी को-आॅपरेटिव्ह बँकेला डबघाईस आणणाऱ्या ३६२ कर्जबुडव्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने (आरबीआय) बँकेच्या प्रशासकीय मंडळाला दिले आहेत. रूपी बँकेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आरबीआयने रूपी बँकेवरील प्रशासकीय मंडळ आणि सहकार आयुक्त यांची मंगळवारी मुंबईत बैठक बोलाविली होती. त्याला आरबीआयचे कार्यकारी संचालक विश्वनाथन, सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, रुपी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष सुधीर पंडित, सदस्य विजय भावे, अच्युत हिरवे आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये नवीन प्रशासकीय मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. प्रशासकीय मंडळाला आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
‘रूपी’च्या ३६२ कर्जबुडव्यांंवर गुन्हे दाखल करा - आरबीआय
By admin | Updated: May 26, 2016 01:12 IST