ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - पगार मागितला म्हणून विनोद कांबळी व त्याची पत्नी अँड्रिया या दोघांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप विनोद कांबळीच्या मोलकरणीने केला आहे. याप्रकरणी विनोद कांबळी व त्याच्या पत्नीविरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
विनोद कांबळीच्या घरी काम करणा-या मोलकरणीचा व कांबळी दाम्पत्यामध्ये पगारावरुन वाद होता. मोलकरणीने कांबळी दाम्पत्याकडे पगारवाढ मागितली होती. यानंतर कांबळी दाम्पत्याने तीन दिवस एका खोलीत डांबून ठेवले व मारहाण केली असा आरोप त्यांच्या मोलकरणीने केला आहे. तीन दिवसांनी सुटका झाल्यावर मोलकरणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी विनोद कांबळीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.