शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

‘राजकीय होर्डिंग्ज लावणाऱ्यांवर गुन्हे’

By admin | Updated: January 7, 2017 03:57 IST

निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने तिची कडक अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन यांनी कार्यवाहीला प्रारंभ केला

कल्याण : कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने तिची कडक अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन यांनी कार्यवाहीला प्रारंभ केला आहे. यात राजकीय होर्डिंग्ज, झेंडे लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, असे आदेश त्यांनी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त लावलेले फलकही उतरवण्यात आले आहेत. कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी जाहीर झाला. यामुळे आचारसंहिता लागू झाल्याने गुरुवारी सायंकाळी आयुक्त ई. रवींद्रन यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात, आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या. त्यात राजकीय बॅनर, झेंडे, होर्डिंग्ज लावणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले. याबाबतचे परिपत्रक सर्वच प्रभागांना पाठवण्यात आले आहे. दरम्यान, ठाकरे यांच्या स्मारकाच्या लोकार्पणानिमित्त कल्याण-डोंबिवली शहरांत कार्यक्रमाचे मोठमोठे बॅनर, होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. आचारसंहितेच्या कचाट्यात लोकार्पण कार्यक्रमही अडकला होता. परंतु, शुक्रवारी सायंकाळी निवडणूक आयोगाने कार्यक्रमाला परवानगी दिल्याने शिवसैनिकांचा उत्साह एकीकडे वाढला असताना दुसरीकडे प्रभाग अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे होर्डिंग्ज, बॅनर आणि झेंडे जप्त करण्यास सुरुवात केली. (प्रतिनिधी)।शिवसैनिकांमध्ये नाराजीस्मारकाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या होर्डिंग्जवर महापालिकेने कारवाई केल्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यांच्यात आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये खटके उडण्याची चिन्हे आहेत.