शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सातवीच्या विदयार्थ्यावर विनयभंगाचा गुन्हा

By admin | Updated: September 16, 2016 23:58 IST

वर्गातील मुलीला सलग दोन वर्षांपासून त्रास देणा-या आणि आता अधिकच निर्ढावलेल्या सातवीच्या एका विद्यार्थ्यावर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. १६ : वर्गातील मुलीला सलग दोन वर्षांपासून त्रास देणा-या आणि आता अधिकच निर्ढावलेल्या सातवीच्या एका विद्यार्थ्यावर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पालकांसह पोलिसांनाही अचंबित करणारा हा प्रकार अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.

या प्रकरणातील पिडीत मुलीने नोंदविलेल्या तक्रारीनुसार आणि पोलिसांनी विनयभंगासह अनेक गंभीर आरोपावरून गुन्हा दाखल केलेल्या मुलाचे वय अवघे १२ वर्षे आहे. तो सातव्या वर्गात शिकतो. दोन वर्षांपूर्वी तो पाचवीत होता. अजनीतील एका शाळेत शिकणा-या या मुलाच्या बाजूच्या बेंचवर एक मुलगी बसायची. क्षुल्लक कारणावरून तो तिला चिडवायचा. मुलगी गरिब कुटुंबातील असून, वडील आजारी असल्यामुळे ती नातेवाईकांकडे आश्रयाला आहे. कधी टोमणे मारायचा, कधी पेन, पेन्सिल तर कधी कंपॉस फेकून मारायचा.

मुलगी दोन वर्षांपासून निमुटपणे त्याचा त्रास सहन करीत होती. आता ती अन् तो बारा वर्षांचा झाला. दोघेही सातवीत शिकतात. मुलगी प्रतिकार करत नसल्याचे पाहून तो चांगलाच निर्ढावला. मुलीची वेणी ओढणे, तिच्या अंगावरून नको त्या ठिकाणाहून हात फिरवणे, अश्लिल शिवीगाळ करणे अन् विरोध केल्यास धमकी देण्यापर्यंत त्याची हिम्मत वाढली. त्याचा त्रास कमी होण्याऐवजी सारखा वाढतच राहिला. ७ सप्टेंबरला दुपारी १.३० वाजता त्याने पीडित मुलीला अश्लिल शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच मारण्याची धमकीही दिली.

त्रास असह्य झाल्यामुळे पीडित मुलीने आपल्या पालकांकडे तक्रार केली. पालकांनी अजनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. ठाणेदार संदिपान पवार यांनी प्रकरणाची शहानिशा करून घेतली. त्यानंतर पीडित मुलीच्या पालकांची तक्रार नोंदवून घेत शुक्रवारी ह्यत्याह्य मुलाविरुद्ध भादंविच्या कलम ३५४ (विनयभंग) ५०९, ३२३ (मारहाण करणे), ५०६ (धमकी देणे) तसेच बाल लैंगिक अपराध प्रतिबंधक अधिनिअम २०१२ च्या सहकलम ८, १२ अन्वये गुन्हा दाखल केला. सर्वत्र खळबळ या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांनी प्रकरणाची संवेदनशिलता लक्षात घेत गुन्हा दाखल केला. मात्र, गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तात पोलीस दल व्यस्त असल्याने गुन्हा दाखल केलेल्या मुलाला ताब्यात घेतले नाही. शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी सकाळी त्याला तब्यात घेऊन त्याची सुधारगृहात रवानगी केली जाईल, असे अजनी पोलिसांनी लोकमतला सांगितले.