शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

इंद्राणी मुखर्जीसहीत अन्य कैद्यांनी भडकवलेलं दंगल प्रकरण आता गुन्हे शाखेकडे

By admin | Updated: July 3, 2017 13:50 IST

इंद्राणी मुखर्जीसहीत अन्य कैद्यांनी भायखळा जेलमध्ये घडवून आणलेले दंगल प्रकरण आता गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - भायखळा जेलमधील मंजुळा गोविंद शेट्ये या महिला कैद्याच्या मृत्यूनंतर झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी व अन्य 200 महिला कैद्यांविरोधात गुन्हा दाखल केला.  आता हे प्रकरण मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले आहे.   गुन्हेगारी कट रचणे, दंगल घडवणे या कलमांखाली इंद्राणी व अन्य 200 महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
मुंबई गुन्हे शाखेचे प्रमुख संजय सक्सेना यांनी सांगितले की, गुन्हे शाखेनं नागपाडा पोलीस ठाण्यातून हे प्रकरण हाती घेतले आहे. पोलिसांनी या प्रकरणात असा दावा केला आहे की,  मंजुळा गोविंद शेट्ये या महिला कैद्याच्या मृत्यूनंतर झालेल्या हिंसाचारामागे शीना बोरा हत्याप्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जीचा हात आहे. तिनंच अन्य कैद्यांना दंगल घडवण्यासाठी प्रवृत्त केले. 
(भायखळा कारागृहात कैद्यांची तोडफोड)
जेल अधिका-यांनी मंजुळा शेट्ये या महिला कैद्याला कथितस्वरुपात मारहाण केल्यानंतर 23 जूनच्या रात्री तिचा सरकारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा निषेध करण्यासाठी अन्य महिला कैद्यांनी टेबल, खुर्चीं, स्वयंपाक घरातील सामानाची तोडफोड, तर कुठे छतावर चढून सुरू असलेल्या जाळपोळीसह प्रशासनाविरोधातील नारेबाजी केली. तर या सर्व कैद्यांना भडकवण्यामागे इंद्राणी मुखर्जीचा हात होता, असा दावा पोलिसांनी केला आहे. 
 
दरम्यान, मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणी जेलमधील 6 कर्मचा-यांचं निलंबन करण्यात आले आहे. शिवाय, शनिवारी त्यांना अटकदेखील करण्यात आले होते. 
 
कोण होती मंजुळा?
 
भांडुपमधील रहिवासी असलेली मंजुळा ही भांडुपच्या एका शाळेत शिक्षिका होती. १९९६ मध्ये तिने आई गोदावरीच्या मदतीने तिच्या भावजयीची जाळून हत्या केली.
 
या गुन्ह्यात दोघींनाही दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. दोघींचीही रवानगी पुण्याच्या येरवडा कारागृहात करण्यात आली होती. सहा महिन्यांपूर्वी तिच्या आईचा आजारपणामुळे कारागृहातच मृत्यू झाला. त्यामुळे तिने तेथे करमत नसून भायखळा कारागृहात बदली करून देण्याची मागणी केली.
 
गेल्या पाच महिन्यांपासून ती भायखळा कारागृहात आहे. शुक्रवारी रात्री तिचाही आजारपणामुळे मृत्यू झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.