शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बदली रॅकेटप्रकरणी गुन्हे शाखेचे पथक दिल्लीला

By admin | Updated: June 6, 2017 06:09 IST

बदली रॅकेटप्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी मुंबई गुन्हे शाखेची तीन पथके दिल्लीला रवाना झाली आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बदली रॅकेटप्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी मुंबई गुन्हे शाखेची तीन पथके दिल्लीला रवाना झाली आहेत. त्यामुळे दिल्लीतून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.महानंद डेअरीचा महाव्यवस्थापक विद्यासागर हिरमुखे याच्यासह दिल्लीचा रवींद्रसिंग मोहबतसिंग यादव उर्फ शर्मा, पुण्याचा विशाल उंबळे, सोलापूरचा किशोर माळी, पुण्यातील कमलेश कानडे गुन्हे शाखेच्या कोठडीत आहेत. त्यांच्या कॉल रेकॉर्डमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास सुरू आहे. शर्मा मूळचा दिल्ली येथील साकेतचा रहिवासी आहे. त्याची दिल्लीच्या साउथ एक्स येथे जे-२३ मध्ये त्याची कन्सल्टन्सी फर्म आहे. आयएस, आयपीएस बदल्यांबरोबर जमिनीचे व्यवहार, शासकीय कामांमध्ये पैसे घेऊन तो काम करत होता. एखाद्या कामासाठी शर्माला पुढे केले जाई, अशी माहिती समोर आली आहे. शर्माच्या दिल्लीतील राहत्या घरी, तसेच त्याच्या कन्सल्टन्सी फर्मचीही तपास पथके झडती घेतील. यातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे कारवाईस वेग येण्याची शक्यता गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना वर्तविली. दरम्यान, शर्मा, हिरमुखे यांच्या संपर्कात असलेल्या दिल्लीतील बड्या हस्तींचीही चौकशी सुरू आहे. त्यामुळे दिल्लीतून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शर्मा याच्या मालमत्तेचाही गुन्हे शाखा आढावा घेत आहे.