शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील सहा शिवसैनिकांवर गुन्हे

By admin | Updated: June 20, 2017 02:26 IST

मराठी भाषेतच दुकानदारांनी फलक लावावेत, यासाठी केलेल्या आंदोलनप्रकरणी डोंबिवली शिवसेना शहरप्रमुखांसह सहा जणांविरोधात रामनगर पोलिसांनी तीन

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : मराठी भाषेतच दुकानदारांनी फलक लावावेत, यासाठी केलेल्या आंदोलनप्रकरणी डोंबिवली शिवसेना शहरप्रमुखांसह सहा जणांविरोधात रामनगर पोलिसांनी तीन महिन्यांनंतर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजार राहण्याची नोटीस बजावली आहे. पोलिसांनी शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी, परिवहन सभापती संजय पावशे, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, उपशहरप्रमुख किशोर मानकामे, महिला संघटक कविता गावंड आणि प्रवीण गोरे यांच्याविरोधात विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले. तसेच त्यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.शिवसैनिकांनी कोणतीही परवानगी न घेता, कुरिअर कंपनीत प्रवेश करून सूचना फलकावर शाई फासली, तसेच सामानाचे नुकसान केल्याने नोटीस बजावल्याचे रामनगर पोलिसांनी सांगितले. कंपनीच्या व्यवस्थापकाची तक्रार नसतानाही केवळ राजकीय व्यक्तींनीदबाव टाकून गुन्हा दाखल करण्यास भाग पाडल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. शहरप्रमुख भाऊ चौधरी म्हणाले की, भाजपा सत्तेचा गैरवापर करत आहे. काँग्रेसच्या राजवटीत सेनेने अनेक आंदोलने केली, पण असे गुन्हे दाखल झाले नाहीत. आता पुन्हा शिवसैनिकांना टार्गेट केले जात आहे.