शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
5
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
6
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
7
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
8
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
9
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
10
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
11
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
12
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
13
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
14
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
15
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
16
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
17
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
18
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
19
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
20
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या

पोकलॅण्ड व तीन डंपरचालकांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: June 25, 2014 19:01 IST

गिरणा नदी पात्रातून शासनाची परवानगी न घेता वाळूची वाहतूक करणार्‍या पोकलॅण्ड आणि तीन डंपरच्या चालक व मालकाविरुद्ध महसूल प्रशासनाने तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.

जळगाव : गिरणा नदी पात्रातून शासनाची परवानगी न घेता वाळूची वाहतूक करणार्‍या पोकलॅण्ड आणि तीन डंपरच्या चालक व मालकाविरुद्ध महसूल प्रशासनाने तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.मंगळवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास दापोरा येथील तलाठी संदीप गुलाबचंद धोबाड (वय-३१) यांच्या पथकाने दापोरा शिवारातील जगदिश अत्तरदे व शालीग्राम काळे यांच्या शेताजवळील गिरणा नदी पात्रातून पोकलॅन्डने वाळूची वाहतूक करणार्‍या डंपर चालकांना पकडले. पथकाला शेख सैयद फैयाज अल्लाउद्दीन, एमएच १९ झेड ७४७४, एमएच १९ झेड ४८७७, एमएच १९ झेड ७२६ या डंपरमध्ये १२ हजार रुपये किंमतीची १२ ब्रास चोरीची वाळू आढळली. तलाठी संदीप धोबाड यांनी सर्व डंपरचालकांना तहसील कार्यालयात येण्याची सूचना केली. शेख सैयद फैयाज अल्लाउद्दीन हा आपले डंपर तहसील कार्यालयात लावून निघून गेला. तर अन्य डंपर चालक जळगावात निघून गेले. त्यानंतर धोबाड यांनी तालुका पोलीस स्टेशनला येत चार डंपरचे चालक व मालक तसेच पोकलॅण्ड व सेक्शन पंपावरील चालक व मालकाविरुद्ध फिर्याद दिली आणि गुन्हा दाखल झाला. दापोरा शिवारातील गिरणा नदी पात्रातून शासनाची परवानगी नसताना अनेक महिन्यांपासून वाळूची चोरटी वाहतूक केली जात आहे. महसूल प्रशासनाने वाळू चोरांविरुद्ध कारवाई करण्याची सूचना केली.