शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा

By admin | Updated: March 31, 2016 01:54 IST

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळअंतर्गत मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालव्याचे मातीकाम व बांधकामाच्या निविदा प्रक्रियेदरम्यान झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी

नागपूर : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळअंतर्गत मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालव्याचे मातीकाम व बांधकामाच्या निविदा प्रक्रियेदरम्यान झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात तीन अधिकारी व कंत्राटदार कंपनीचे संचालक आणि त्यांचे भागीदार यांचा समावेश आहे.सेवानिवृत्त मुख्य अभियंता सोपान रामराव सूर्यवंशी (६५) रा. मल्हार प्लॉट नं.२१ सहकारनगर उस्मानपुरा औरंगाबाद, गोसीखुर्द डावा कालवा वाही पवनीचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उमाशंकर वासुदेव पर्वते (५९) रा. सरस्वतीनगर मानेवाडा रिंगरोड, वरिष्ठ विभागीय लेखाधिकारी चंदन तुळशीराम जिभकाटे (५७) रा. आयुर्वेदिक ले-आऊट उमरेड रोड या अधिकाऱ्यांसह कंत्राटदार आर.जे शाह अ‍ॅण्ड कंपनी लि. मुंबईच्या संचालिका कालिंदी राजेंद्र शाह (६७), तेजस्विनी राजेंद्र शाह (६४), त्यांचे भागीदार डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीचे संचालक विशाल प्रवीण ठक्कर (३६), प्रवीण नाथालाल ठक्कर (६७), जिगर प्रवीण ठक्कर (३८), अरुण कुमार गुप्ता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याच्या गृहविभागाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरअंतर्गत सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहारासंदर्भात उघड चौकशी करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) दिले आहेत. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या नेतृत्त्वाखाली ही चौकशी सुरूआहे.सिंचन घोटाळा कारवाईएसीबीचे अधीक्षक संजय दराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालव्याच्या निविदा प्रक्रियेदरम्यान विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांनी २००९मध्ये निविदा मागविल्या होत्या. त्यावेळी चार कंत्राटदार कंपन्यांनी या निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेतला, असे दाखविण्यात आले होते. त्यात आर. जे. शाह अ‍ॅण्ड कंपनी आणि डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रा.लि. (जे.व्ही) यांना या कालव्याच्या कामाचे कंत्राट देण्यात आले.चौकशीमध्ये आर.जे. शाह अ‍ॅण्ड कंपनी लि. आणि डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रा. लि. (जे.व्ही) व इतरांनी ही निविदा प्रक्रिया स्पर्धात्मक झाल्याचे दाखविण्याकरिता ठक्कर परिवाराचेच एस. एन. ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रा.लि. या कंपनीने प्रक्रियेत भाग घेतला. श्रीनिवासा कन्स्ट्रक्शनच्या निविदेसोबत भरावयाची बयाणा रक्कम डी. कन्स्ट्रक्शन्स प्रा.लि. या कंपनीच्या बँक खात्यातून भरण्यात आली. डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या भागीदाराने खोटी माहिती सादर केल्याचे आढळले.