शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षे होऊनही शेतकऱ्यांवर गुन्हे

By admin | Updated: August 9, 2016 01:47 IST

मावळ गोळीबाराला ५ वर्षे सोमवारी पूर्ण झाली. मात्र, बंद जलवाहिनी प्रकल्प रद्द करण्याची आणि आंदोलनातील शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे युतीच्या नेत्यांनी दिलेले

पवनानगर : मावळ गोळीबाराला ५ वर्षे सोमवारी पूर्ण झाली. मात्र, बंद जलवाहिनी प्रकल्प रद्द करण्याची आणि आंदोलनातील शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे युतीच्या नेत्यांनी दिलेले आश्वासन त्यांचे सरकार येऊनही अद्याप पूर्ण केल नाही.पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहराला बंद जलवाहिनीतून पाणी नेण्यासाठी मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध करण्यासाठी ९ आॅगस्ट २०११ रोजी मुंबई-पुणे महामार्गावर रस्ता रोको करून आंदोलन केले होते. या आंदोलनात भाजपा, शिवसेना, आरपीआय, काँग्रेस हे राजकीय पक्षही सहभागी होते. हे आंदोलन थांबवण्यासाठी पोलीस व आंदोलनकर्ते यात खटका उडाला व हे आंदोलन चिघळले. यातून पोलिसांनी गोळीबार केला. त्यात कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे व श्याम तुपे हे तीन शेतकरी मृत्युमुखी पडले. या घटनेनंतर त्या काळातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य सरकारने आंदोलनात शहीद झालेल्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरीत घेण्याचे आश्वासन दिले होते. खूप उशिराने त्या तीन कुटुंबांतील प्रत्येकी एकेका व्यक्तीला महापालिकेत नोकरी देण्यात आली आहे. आंदोलन काळात शेतकऱ्यांवर ३०७सारखे गंभीर गुन्हे नोंदवले गेले आहेत. युती शासन आल्यानंतर हे गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन निवडणूक प्रचारात युतीच्या नेत्यांनी दिले होते. बंद जलवाहिनी प्रकल्प कायमचा रद्द करू, असेही सांगितले होते. मात्र, युती शासन सत्तेत येऊन २ वर्षे होत आली, तरी प्रकल्प रद्दची घोषणा झालेली नाही. शेतकऱ्यांवरील गुन्हेही मागे घेण्यात आलेले नाहीत.