शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

‘महानंद’च्या अठरा संचालकांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: January 20, 2016 03:30 IST

कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी बरखास्त केलेल्या तत्कालीन संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक आणि वित्त सल्लागारांविरुद्ध गोरेगावच्या वनराई पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबई : कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी बरखास्त केलेल्या तत्कालीन संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक आणि वित्त सल्लागारांविरुद्ध गोरेगावच्या वनराई पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्र राज्य दूध वितरक आणि वाहतूक संघटनेचे अध्यक्ष नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, २००० ते २००५मध्ये महानंद दूध डेअरी महासंघाने कोट्यवधींचा घोटाळा केला. माहितीच्या अधिकारातून ही बाब शासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यात उस्मानाबादच्या भूम तालुका दूध संघाला एप्रिल २००९मध्ये नियमांचे उल्लंघन करून ६५ लाख रुपये अग्रीम रक्कम देण्यात आली होती. महानंदच्या संचालक मंडळाने विशेष अग्रीम वाटपाबाबत निश्चित करण्यात आलेल्या मार्गदर्शक धोरणाचे जाणीवपूर्वक उल्लंघन करून ही जास्तीची रक्कम दिली. त्या वेळी भूम तालुका दूध संघाचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादीचे आ. राहुल मोटे हे महासंघावर संचालक होते. पालिका अतिरिक्त आयुक्त एस.व्ही. श्रीनिवासन व्यवस्थापकीय संचालक होते. सध्या महावितरणामध्ये असलेले नंदलाल विसपुते आणि वाव्हळ हे तेव्हा वित्त सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडून देण्यात आलेली रक्कम ३१ मार्च २०११पासून थकीत आहे. या रकमेच्या बदल्यात भूम दूध संघाने महानंदला दुधाचा पुरवठा केला नसल्याचे नाईक यांनी तक्रारीत नमूद केले आहे. (प्र्रतिनिधी)विनायक पाटील, शिवराम जाधव, राजसिंह मोहिते-पाटील, पुंडलिक काजे, शांताराम तुळसीदास देशमुख, सुभाष सूर्यवंशी, राजेंद्र जाधव, नीलकंठ कोढे, श्रीधर ठाकरे, दीपक पाटील, रामराव वडकुते, राजेंद्र सूर्यवंशी, सुनील फुंडे, रंजना पडोळे, कौशल्या पवार, गीता चौधरी, हिंमतराव पवार या १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, तो आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत गुरव यांनी दिली.