शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

तत्कालीन सीईओसह लेखाधिकाऱ्यावर गुन्हे

By admin | Updated: July 18, 2014 00:56 IST

चंद्रपूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अकोल्याचे विद्यमान जिल्हाधिकारी अरुण शिंदे आणि जिल्हा परिषदेचे तत्कालीन वर्ग एक लेखाधिकारी अविनाश गंगाधर जोशी

भ्रष्टाचाराच्या तक्रारीचे प्रकरण : न्यायालयाच्या निर्देशावरून झाली कारवाईचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अकोल्याचे विद्यमान जिल्हाधिकारी अरुण शिंदे आणि जिल्हा परिषदेचे तत्कालीन वर्ग एक लेखाधिकारी अविनाश गंगाधर जोशी यांच्याविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी दुपारी न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल झाला आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेतील कथित भ्र्रष्टाचाराच्या आरोप-प्रत्यारोपावरून आणि त्यासंदर्भात झालेल्या तक्रारींवरून हे प्रकरण घडले आहे. जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी असताना शिंदे यांनी तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू राजगडकर, कार्यकारी अभियंता भूषण मून, कोरपना उपविभागाचे प्रभारी उपविभागीय अभियंता रमेश शंभरकर यांच्यासह कनिष्ठ अधिकारी आणि कंत्राटदर अशा आठ जणांवर शासकीय फाईलमध्ये बेकायदेशिररीत्या बदल केल्याचा व त्यासाठी खोटी कागदपत्रे जोडल्याचा आरोप करून त्यांची चौकशी सुरु केली होती. जिल्हा परिषदेचे तत्कालीन लेखाधिकारी अविनाश जोशी यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी केली होती. मात्र आपल्यावरील आरोप खोटे असून चौकशीही पूर्वग्रहदूषितपणे झाल्याचा आरोप या आठही जणांनी केला होता. दरम्यान, जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष आणि विद्यमान सदस्य विनोद अहीरकर यांच्याशीही शिंदे यांचे संबंध कमालीचे दुरावले होते. अहीरकर यांनी अरुण शिंदे यांच्या संदर्भात माहितीच्या अधिकारात विविध माहिती गोळा करून २१ प्रकरणांमध्ये अनियमितता केल्याची तक्रार शासनाकडे केली होती. यात लक्षावधी रुपयांची खरेदी, नियमबाह्य आदेश देणे आदी आरोपांचा समावेश होता. या तक्रारीची शासनस्तरावर दखल घेतली जात नसल्याचे बघून जिल्हा परिषदेने त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला होता. तो पारित झाल्यावर काही काळाने अकोला येथे जिल्हाधिकारी म्हणून त्यांची बदली झाली होती. दरम्यानच्या काळात निवृत्त झाल्यावर जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भूषण मून यांनी चंद्रपूरच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अरुण शिंदे यांच्या विरोधात प्रकरण दाखल केले होते. त्यावर निर्णय होऊन अरुण शिंदे आणि लेखाधिकारी अविनाश जोशी यांच्याविरुद्ध कलम ४०८, ४६८, ४७१, ४७७, १२० अणि ३४ नुसार गुन्हे दाखल करण्याचे निर्देश रामनगर पोलिसांना दिले होते. मात्र पोलिसांनी दखल घेतली नव्हती. यामुळे मून यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेऊन ही परिस्थिती निदर्शनास आणून दिली. त्यानंतर न्यायालयाने नव्याने दिलेल्या निर्णयानुसार गुरुवारी दुपारी रामनगर पोलिसांत दोघांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. सध्या भूषण मून आणि वर्ग एक लेखाधिकारी अविनाश जोशी सेवानिवृत्त झाले आहेत. अरुण शिंदे अकोल्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर, प्रभू राजगडकर गडचिरोली जिल्ह्यात सेवारत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)