शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
6
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
7
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
8
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
9
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
10
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
11
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
12
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
13
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
14
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
15
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
16
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
17
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
19
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
20
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार

जमीन व्यावसायिकासह चाळीस जणांवर गुन्हा

By admin | Updated: June 29, 2016 02:36 IST

शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या महाडमधील एका जमीन व्यावसायिकासह चाळीस जणांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाड : तालुक्यातील कोथुर्डे येथील एका जमीन मालकाच्या जागेमध्ये दुसऱ्या एका इस्टेट एजन्सीचा फलक बळजबरीने लावल्याप्रकरणी तसेच त्या वादात तलवार, गुप्तीचा धाक दाखवून रखवालदाराला शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या महाडमधील एका जमीन व्यावसायिकासह चाळीस जणांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बोरीवली येथील योगेश ओमप्रकाश चोले यांनी फिर्याद दाखल केली आहे. योगेश चोले हे इकबाल कासकर यांच्या मालकीच्या कोथुर्डे येथील जमिनीची रखवाली करतात. २७ जूनला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास महाड येथील जमीन व्यावसायिक अविकुमार धुळे व त्यांच्या सोबत इतर चाळीस जण कासकर यांच्या जागेत येवून बळजबरीने इस्टेट एजन्सीचा फलक लावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी रखवालदार चोले यांना धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अविकुमार धुळे यांच्यासह चाळीस जणांवर गुन्हा दाखल आहे. जीवे मारण्याची धमकी महाड येथील जमीन व्यावसायिक अविकुमार धुळे व त्यांच्या सोबत इतर चाळीस जण कासकर यांच्या जागेत येवून बळजबरीने धुळे इस्टेट एजन्सीचा फलक लावल्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी रखवालदार चोले यांना गुप्ती आणि तलवारीचा धाक दाखवून फलक लावू न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत तो फलक जबरदस्तीने कासकर यांच्या जागेत लावला. याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.