शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

सहाय्यक आयुक्तासह २१ अभियंत्यांवर गुन्हा

By admin | Updated: November 20, 2014 03:15 IST

मुंबई महापालिकेतल्या ई निविदा प्रक्रियेतील कोट्यवधींच्या घोटाळयाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त देवेंद्रकुमा

मुंबई : मुंबई महापालिकेतल्या ई निविदा प्रक्रियेतील कोट्यवधींच्या घोटाळयाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांच्यासह २१ अभियंते, एबीएम नॉलेजवेअर कंपनीच्या चार संचालकांविरोधात गुन्हा नोंदविला.या घोटाळयाप्रकरणी दाखल झालेल्या खासगी तक्रारीवरील सुनावणीत दंडाधिकारी न्यायालयाने १२ नोव्हेंबरला दखलपात्र गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश एसीबीला दिले होते. न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळताच एसीबीने आज संबंधितांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, भारतीय दंडसंहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविला. जैन, अभियंते तसेच कंपनीच्या संचालकांनी पालिकेची फसवणूक केली, खोटी कागदपत्रे तयार केली आणि शंभर कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. गुन्हा नोंद झालेल्या पालिका अधिकारी, कंपनी संचालकांच्या निवासस्थानी, कार्यालयांमध्ये एसीबीच्या धाडी पडण्याची दाट शक्यता आहे. पालिकेच्या निविदा प्रक्रियेतील ठेकेदारांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी आयुक्त सीताराम कुंटे यांनी ई निविदा प्रक्रिया आणली़ मात्र ठेकेदारांनी वॉर्ड स्तरावर अभियंत्यांशी संगनमत करून या प्रक्रियेत शंभर कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप नगरसेवकांकडून होऊ लागला़ या प्रकरणाच्या चौकशीत २२ अभियंता गुंतले असल्याचे उजेडात आले़ मात्र यामध्ये आर्थिक नुकसान नसल्यामुळे यास भ्रष्टाचार म्हणता येणार नाही, असा पावित्रा आयुक्त सीताराम कुंटे यांनी घेतला होता. नगरसेवकांनी याप्रकरणी कोंडीत पकडल्यानंतर २२ जणांची खातेनिहाय चौकशी सुरू केली. दोषींवर कारवाई व्हावी यासाठी भाजपाचे मुंबई सरचिटणीस विवेकानंद गुप्ता यांनी खासगी तक्रार करून दाद मागितली होती.