शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

नेवाळी आंदोलनप्रकरणी २ हजार जणांवर गुन्हे

By admin | Updated: June 25, 2017 02:31 IST

नेवाळीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाप्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत दोन हजारांहून अधिक गावकऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण/उल्हासनगर : नेवाळीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाप्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत दोन हजारांहून अधिक गावकऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून चार तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या आंदोलनात दीड कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा ठपका पोलिसांनी आंदोलकांवर ठेवला आहे.दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ब्रिटिशांनी घेतलेल्या शेतजमिनी परत कराव्यात, या मागणीसाठी स्थानिक शेतकऱ्यांनी गुरुवारी आंदोलन केले होते. पण या आंदोलनाला हिंसक वळण लागले. उल्हासनगरचे हिललाइन पोलीस ठाणे, डोंबिवलीचे मानपाडा पोलीस ठाणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. ठार मारण्याचा प्रयत्न, त्या उद्देशाने मारहाण, पोलिसांसह खासगी गाड्यांची जाळपोळ, पेट्रोल बॉम्बचा वापर, सरकारी कामात अडथळा आणणे, महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग, हाणामारी, शस्त्र बाळगणे आदी गुन्हे हिललाइन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. या आंदोलनात शेतकऱ्यांनी वाहने जाळली, तोडफोड केल्याने एक कोटी ५७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा पोलिसांनी केला आहे.पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात दोन साहाय्यक पोलीस निरीक्षक, एक पोलीस नाईक सरकारी फिर्यादी आहेत. जमीन बचाव आंदोलन समितीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेतकरी व तरुण कार्यकर्त्यांनी पूर्वनियोजित पद्धतीने आंदोलनाला हिंसक वळण दिले. ठार मारण्याच्या उद्देशाने पोलिसांना मारहाण केली.स्फोटक साहित्य आणि हत्यारे घेऊन आंदोलन हिंसक केल्याचा आरोप या गुन्ह्यांत करण्यात आला आहे. कट रचणे, शांतताभंग करणे, दंगल करणे, क्रिमिनल अ‍ॅक्ट, मुंबई पोलीस अ‍ॅक्टद्वारे हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अंबरनाथमधून चौघांना पकडले नेवाळी पाड्यातील दीड हजार आणि भाल गावातील ४०० ते ५०० जणांविरुद्ध गुन्हे नोंदवले आहेत. त्यात या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या जमीन बचाव आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांचा समावेश आहे. गुन्हा दाखल केलेल्यांपैकी चार जणांना अंबरनाथच्या रासायनिक कारखान्यात काम करताना तेथे जाऊन पोलिसांनी ताब्यात घेतले. विशाल सोरखादे, कुंदन म्हात्रे, योगेश म्हात्रे, आकाश म्हात्रे अशी त्यांची नावे आहेत.