शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-बेळगाव एसटीचे स्वागत करणाऱ्या १५ जणांवर गुन्हे

By admin | Updated: June 4, 2017 00:26 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या ‘जय महाराष्ट्र’ लिहिलेल्या बसचे स्वागत करणाऱ्या मराठी भाषिकांसह बसचालक, वाहक अशा १५ जणांवर गुन्हे दाखल

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई / बेळगाव : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या ‘जय महाराष्ट्र’ लिहिलेल्या बसचे स्वागत करणाऱ्या मराठी भाषिकांसह बसचालक, वाहक अशा १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन भाषिकांत तेढ निर्माण केल्याची कलमे त्यांच्याविरोधात लावण्यात आली. बेळगाव मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालेल्यांमध्ये एसटीचालक प्रमोद गायकवाड, वाहक देविदास मोरटे (दोघेही सातारा एसटी डेपो), महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते मदन बामणे, अ‍ॅड. अमर येळ्ळूरकर, सूरज कणबरकर, गणेश दड्डीकर, मेघन लंगरकांडे यांच्यासह १५ जणांचा समावेश आहे.एसटीच्या ‘जय महाराष्ट्र’ या नवीन घोषवाक्याचा समावेश असलेली मुंबई-बेळगाव ही पहिली एसटी बस शुक्रवारी रात्री दहाच्या दरम्यान बेळगाव येथे पोहोचली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी या बसचे स्वागत केले होते. यावेळी चालक प्रमोद गायकवाड, वाहक देविदास मोरटे यांचे भगवा फेटा बांधण्यात आला. कर्नाटक शासनाने या घटनेची गंभीर दखल घेत चालक, वाहकांसह १५ कार्यकर्त्यांवर बेळगाव मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. ‘जय महाराष्ट्र’ घटनाक्रमवार : गुरुवारवेळ : सायंकाळी ५ वाजतास्थळ : मुंबई सेंट्रल आगारपरिवहनमंत्री व एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या हस्ते जय महाराष्ट्र लिखित एसटीच्या नव्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. ‘जय महाराष्ट्र’ लिखित पहिली एसटी मुंबई-बेळगाव मार्गावर चालवण्याचे आदेश रावते यांनी या वेळी दिले.वार : शुक्रवार वेळ : सकाळी ७.३० वाजता स्थळ : मुंबई सेंट्रल आगारएसटी महाव्यवस्थापक कॅप्टन रत्नपारखी यांनी ‘जय महाराष्ट्र’ लिखित मुंबई-बेळगाव एसटीला हिरवा झेंडा दाखवून एसटी मार्गस्थ केली.वार : शुक्रवारवेळ : रात्री १०.१५ वाजतास्थळ : बेळगाव एसटी स्थानकजय महाराष्ट्र लिखित मुंबई-बेळगाव एसटीच्या चालक-वाहकांचा फेटे घालून पेढा भरवत सत्कार केला. एसटीला हार घालून स्थानकांवर ‘जय महाराष्ट्र’ अशा घोषणा देण्यात आल्या.वार : शुक्रवारवेळ : रात्री ११.३० च्या सुमारासस्थळ : बेळगाव पोलीस ठाणेमुंबई-बेळगाव एसटी चालक-वाहक यांना चौकशीसाठी बेळगाव पोलीस ठाणे येथे आणण्यात आले. तेथे चालक-वाहकाचे नाव, बॅच आणि पत्ता घेण्यात आला. कानडी भाषेतील लिखित कागदांवर चालक-वाहकांची स्वाक्षरी घेऊन शनिवारी पहाटे १ च्या सुमारास चालक-वाहकाला सोडण्यात आले.