शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

टीडीपी आमदारासह १३ अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: May 1, 2017 04:13 IST

गोसेखुर्द सिंचन महाघोटाळ्यातील दोन प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी)े गुन्हा दाखल करीत आंध्र प्रदेशातील टीडीपीचे

नागपूर : गोसेखुर्द सिंचन महाघोटाळ्यातील दोन प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी)े गुन्हा दाखल करीत आंध्र प्रदेशातील टीडीपीचे आमदार डी. व्ही. रामाराम यांच्यासह १३ अधिकाऱ्यांविरुद्ध फसवणूक आणि गुन्हेगारी षड्यंत्रअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे अनुक्रमे १५.४९ कोटी आणि ७.८१ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणाशी संबधित आरोपी हादरले आहेत. एसीबी अनेक दिवसांपासून गोसेखुर्द महाघोटाळ्याची चौकशी करीत आहे. गोसेखुर्द प्रकल्पातील पेंढरी शाखेत उपसा सिंचन योजनेंतर्गत कालव्याचे बांधकाम आणि मातीकामासाठी (८.५२ ते ४३.८० कि.मी.) २००६ मध्ये विदर्भ सिंचन विकास महामंडळाने (व्हीआयडीसी) निविदा काढल्या होत्या. या निविदा प्रक्रियेत तीन कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यात श्रीनिवासन कन्स्ट्रक्शन कंपनी आणि आर. बलरामी रेड्डी अ‍ॅन्ड कंपनीला कंत्राट मिळाले. या कामात मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याने एसीबीने चौकशी सुरू केली. या चौकशीच्या आधारावर एसीबीने मे. श्रीनिवासा कन्स्ट्रक्शनचे मालक टीडीपीचे आमदार बी. व्ही. रामाराव रा. मंगलम् रोड तिरुपती, मे. आर. बालारामी रेड्डी अ‍ॅन्ड कंपनीचे मॅनेजिंग पार्टनर रामी रेड्डी, श्रीनिवासुला रेड्डी, बंजारा हिल्स, तेलंगणा, व्हीआयडीसीचे तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रभाकर विठ्ठलराव मोरघडे रा. इसान टॉवर, शिवाजीनगर, तत्कालीन वरिष्ठ विभागीय लेखापाल श्याम जगदीश आंबुलकर रा. राधाकृष्ण अपार्टमेंट हुडकेश्वर, तत्कालीन अधीक्षक अभियंता दिलीप दीपराव पोहेकर, रा. पडोळे ले-आऊट परसोडी, तत्कालीन मुख्य अभियंता सोपान रामराव सूर्यवंशी, रा. सहकरनगर औरंगाबाद आणि तत्कालीन कार्यकारी संचालक रोहिदास मारुती लांडगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.एसीबीने रविवारी या प्रकरणात मुंबईसह १५ ठिकाणी छापे टाकले. (प्रतिनिधी)३६०० कोटीचा निधी गोसेखुर्द प्रकल्पावरील खर्चाची किंमत जवळपास ३६०० कोटी रुपये आहे. यासाठी जारी केलेल्या ४० निविदांची चौकशी एसीबीच्या नागपूर शाखेतर्फे सुरू आहे. आतापर्यंत ४ प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पहिल्या प्रकरणात एस. ए. कन्स्ट्रक्शनसह सहा आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. दुसऱ्या प्रकरणात शहा कन्स्ट्रकशनसह १३ जणांवर गुन्हा दाखल झाला होता.