शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अपघातातील साध्वींवर ठाण्यात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2017 23:19 IST

साध्वीसह व्हीलचेअर मदतनीस अशा दोघी जागीच ठार झाल्या तर गंभीर जखमी झालेल्या दोन महिलांवर उपचार सुरू आहे.

ऑनलाइन लोकमतभिवंडी दि. 23- मुंबई-नाशिक महामार्गावरील लोढाधाम येथून ठाण्याकडे निघालेल्या जैन साध्वीच्या जथ्याला काल रोजी माणकोलीजवळ अरुण कुमार क्वारीसमोर ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका साध्वीसह व्हीलचेअर मदतनीस अशा दोघी जागीच ठार झाल्या, तर गंभीर जखमी झालेल्या दोन महिलांवर उपचार सुरू आहे.साध्वी रंजना हिराचंद जैन (५२ रा. ठाणे ) व मदतनीस रत्नी (४० रा. झारखंड ) अशा मृत साध्वींची नांवे असुन साध्वी रंजना जैन त्यांच्यावर ठाण्यात बाळकुम येथील साकेत पाईपलाईन येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.तर मदतनीस रत्नी हिचे शव त्यांचे नातेवाईक झारखंड येथे घेऊन गेले. या अपघातात जखमी झालेल्या साध्वी शकुंतला चोपडा व मदतनीस सुमोनी माझी या दोघींवर ठाण्यातील ज्युपीटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.एकूण चार साध्वी झारखंड येथून तिर्थाटन करून ठाणे शहराकडे जात असताना ही दुर्घटना काल घडली.या साध्वी माणकोली बायपास नाक्याजवळील अरुणकुमार क्वारी समोर असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकचालकाने साध्वीच्या जथ्याला धडक दिली.या अपघात प्रकरणी ट्रक चालक दया शंकर यादव यास नारपोली पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी अटक करून कोर्टात हजर केले असता त्यास कोर्टाने जामीन दिला आहे.