शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
4
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
5
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
6
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
7
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
10
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
12
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
13
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
14
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
15
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
16
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
17
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
18
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
19
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

नव्या ३३५ तलाठी सजांची निर्मिती

By admin | Updated: November 19, 2016 03:30 IST

आदिवासी विकासमंत्री सवरांनी केले निर्णयाचे स्वागत राज्याच्या आदिवासी दुर्गम जंगलव्याप्त माडा, मिनीमाडा क्षेत्रात नव्या ३३५ तलाठी सजांची निर्मिती होणार आहे.

वाडा : आदिवासी विकासमंत्री सवरांनी केले निर्णयाचे स्वागत राज्याच्या आदिवासी दुर्गम जंगलव्याप्त माडा, मिनीमाडा क्षेत्रात नव्या ३३५ तलाठी सजांची निर्मिती होणार आहे. महसूल विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील आदिवासी जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे, असे राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी शुक्रवारी वाडा येथे सांगितले.सवरा पुढे म्हणाले की, नव्याने निर्माण होणाऱ्या तलाठी सजा क्षेत्रात शेती व जंगलावर आधारित व्यवसाय हेच आदिवासींच्या उपजीविकेचे साधन आहे. त्यामुळे आदिवासींचा व शेतमजुरांचा नेहमी तलाठ्यांशी थेट संबंध येतो. त्याचबरोबर, बँकांचे कर्ज व्यवहार, नैसर्गिक आपत्ती प्रसंगी तसेच पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करु न बाधित आदिवासींना आर्थिक मदत करणे या निर्णयामुळे आता अधिक सुकर होणार आहे. आदिवासी क्षेत्रात सध्या १,१४८ तलाठी तलाठी सजे असून काल महसूल विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे त्यात ३३५ नव्या सजांची भर पडणार आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल मंत्री विष्णू सवरा यांनी समाधान व्यक्त करु न त्यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, मागील आठवड्यात झालेल्या तलाठी-पटवारी कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर हा राज्य शासनाचा निर्णय महत्वपूर्ण मानला जात असून तलाठी सजांची संख्या वाढणार असल्याने तलाठ्यांचे कामकाज अधिक गतिमान व पारदर्शकपणे होणार असल्याची प्रतिक्रि या व्यक्त होत आहे. (वार्ताहर)>हेलपाटे व पदरमोड...आदिवासी भागामध्ये तलाठी सजाची कमतरता असल्याने अनेकदा कामासाठी हेलपाटे मारण्याची वेळ येते.वर्षाचा बराच काळ रोजगार नसल्याने किंवा स्थलांतरीत जिवन जगावे लागत असल्योन शासकीय कामासाठी होणारी पदरमोड न परवडणारी असते.