शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

आयटीच्या माध्यमातून विश्वासार्ह शासनव्यवस्था निर्माण करणार

By admin | Updated: May 10, 2017 01:09 IST

सरकारच्या विविध योजना व सार्वजनिक सेवा जनतेपर्यंत विनाविलंब आणि सहजपणे पोहोचवण्यासाठी माहिती तंत्रज्ञान (आयटी) हे एक सशक्त माध्यम आहे.

सुरेश भटेवरा । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सरकारच्या विविध योजना व सार्वजनिक सेवा जनतेपर्यंत विनाविलंब आणि सहजपणे पोहोचवण्यासाठी माहिती तंत्रज्ञान (आयटी) हे एक सशक्त माध्यम आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रात एक जबाबदार, पारदर्शक आणि विश्वासार्ह शासनव्यवस्था निर्माण करण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करीत आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या प्रगती मैदानावर ओरॅकल ओपन वर्ल्ड आयोजित कार्यक्रमाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना केले.जनतेला सार्वजनिक सेवा पुरवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अतिशय कल्पक रीतीने माहिती तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल तसेच टेक्नॉलॉजी ट्रान्सफॉर्मेशन क्षेत्रात दूरदृष्टीच्या नेतृत्वाचा साक्षात्कार घडवल्याबद्दल ओरॅकलच्या सीईओ सफ्रा काटझ् यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेष सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले. या सोहळ्यात पुरस्कार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते.पारदर्शक कारभाराला पर्याय नाही, यावर राज्य शासनाचा विश्वास आहे. त्यामुळे डिजिटल माध्यमाचा पुरेपूर लाभ उठवून विश्वासार्ह पद्धतीने सेवा पुरवण्याचा संकल्प आम्ही केला आहे, असे मुख्यमंत्री शेवटीम्हणाले.३७0 सेवा आॅनलाईन पुरविल्या जातात...-सरकारतर्फे ३७० सेवा सध्या आॅनलाईन पुरवल्या जातात. इंटरनेटवर ‘आपले सरकार’ नावाचे महाराष्ट्राचे पोर्टल अगोदरच कार्यरत आहे. याखेरीज राज्य सरकार लवकरच माहिती तंत्रज्ञानाचा एक असा प्लॅटफॉर्म तयार करणार आहे की, सरकारचे वेगवेगळे विभाग एकाच कामासाठी तेच ते दस्तऐवज आणि प्रमाणपत्रे कोणत्याही नागरिकांकडे वारंवार मागणार नाहीत.