शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

सकारात्मक वातावरण निर्मिती करा

By admin | Updated: July 20, 2014 01:13 IST

राज्यातील आगामी विधानसभा निवडणूका लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी सकारात्मक वातावरणनिर्मितीसाठी प्रयत्न करावे व जनप्रतिनिधींनी जनतेच्या स्थानिक

सरसंघचालकांचा संदेश : संघ-भाजपाचे ‘मिशन विधानसभा’ सुरूनागपूर : राज्यातील आगामी विधानसभा निवडणूका लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी सकारात्मक वातावरणनिर्मितीसाठी प्रयत्न करावे व जनप्रतिनिधींनी जनतेच्या स्थानिक समस्या निवारणावर भर द्यावा असा संदेश सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी दिला आहे. संघाचे प्रांत प्रचारक, संघ परिवारातील संघटना व राज्यातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शनिवारपासून नागपुरात २ दिवसीय समन्वय बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीची रुपरेषा पाहता लोकसभा निवडणुकांप्रमाणेच संघकारणाचा ‘फॉर्म्युला’ महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्येदेखील वापरल्या जाण्याची चिन्हे दिसून येत आहेत. रेशीमबाग येथील स्मृतीमंदीर परिसरात सुरू असलेल्या या समन्वय बैठकीत संघाच्या निरनिराळ्या प्रांत प्रचारकांनी तसेच संघ परिवारातील संघटनांनी गेल्या काही काळातील राज्यातील निरनिराळ््या भागातील कामाची रूपरेषा सरसंघचालकांसमोर मांडली. त्याचप्रमाणे विभागनिहाय कुठल्या समस्या प्रचाराचा मुद्दा म्हणून उचलता येतील यावरदेखील चर्चा झाली. त्यात विदर्भातील नक्षलवादाच, मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रातील पाणीटंचाई, राज्यात महिलांवर होणारे अत्याचार, ठिकठिकाणी दलित व वंचितांवरील अन्याय या समस्यांचा उल्लेख झाला. या समस्यांच्या निवारणासाठी प्रयत्न करुन जनतेपर्यंत पोहोचण्यावर जनप्रतिनिधींनी जोर दिला पाहिजे. दुसरीकडे संघ स्वयंसेवकांनी थेट भाजपाचे नाव न घेता सकारात्मक वातावरणनिर्मितीसाठी पुढाकार घ्यावा असेदेखील सांगण्यात आले. लोकसभा निवडणूकांदरम्यान संघ स्वयंसेवकांनी काही राज्यांत घरोघरी जाऊन संपर्क केला होता.या महिन्याच्या अखेरीस स्वयंसेवक व प्रचारकांच्या बैठकीत विधानसभा निवडणूकांसंदर्भातील योजनांची माहिती देण्यात येणार असल्याचेदेखील सूत्रांनी सांगितले. सोबतच समोरील आव्हाने लक्षात घेता संघ परिवारात जास्तीत जास्त प्रशिक्षित व कुशल कार्यकर्ते घडावे यासाठी प्रयत्न करण्यात यावा असा सूरदेखील या बैठकीत दिसून आला.नेत्यांचा ‘दक्ष’ पवित्रा‘लोकमत’ प्रतिनिधीने बैठकस्थळी जाऊन यासंदर्भात माहिती घेतली असता गोवा, गुजरात सोबतच कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील प्रांत प्रचारकांची उपस्थिती दिसून आली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, भाजयुमोच्या प्रदेशाध्यक्ष पंकजा पालवे-मुंडे हेदेखील प्रामुख्याने उपस्थित होते.या बैठकीसंदर्भात संघाच्या पदाधिकाऱ्यांशी प्रतिक्रियेसाठी संपर्क करण्यात आला. परंतु कोणीही प्रतिक्रिया दिली नाही. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील ही ठराविक काळाने घेण्यात आलेली बैठक होती, असे सांगून ‘मौन’ बाळगणेच पसंत केले.