शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक वातावरण निर्मिती करा

By admin | Updated: July 20, 2014 01:16 IST

संघाच्या स्वयंसेवकांनी सकारात्मक वातावरणनिर्मितीसाठी प्रयत्न करावे व जनप्रतिनिधींनी जनतेच्या स्थानिक समस्या निवारणावर भर द्यावा, असा आदेश सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी दिला आहे.

नागपूर : राज्यातील आगामी विधानसभा निवडणूका लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी सकारात्मक वातावरणनिर्मितीसाठी प्रयत्न करावे व जनप्रतिनिधींनी जनतेच्या स्थानिक समस्या निवारणावर भर द्यावा, असा आदेश सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी दिला आहे.  संघाचे प्रांत प्रचारक, संघ परिवारातील संघटना व राज्यातील भाजपाच्या पदाधिका:यांच्या उपस्थितीत शनिवारपासून नागपुरात 2 दिवसीय समन्वय बैठकीला सुरुवात झाली. 
 रेशीमबाग येथील स्मृतीमंदीर परिसरात सुरू असलेल्या या समन्वय बैठकीत विभागनिहाय कुठल्या समस्या निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा म्हणून उचलता येतील यावरदेखील चर्चा झाली. त्यात विदर्भातील नक्षलवाद, मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रातील पाणीटंचाई, महिलांवर होणारे अत्याचार, ठिकठिकाणी दलित व वंचितांवरील अन्याय या समस्यांचा उल्लेख झाला.  संघ स्वयंसेवकांनी थेट भाजपाचे नाव न घेता सकारात्मक वातावरणनिर्मितीसाठी पुढाकार घ्यावा असेदेखील सांगण्यात आले. लोकसभा निवडणूकांदरम्यान संघ स्वयंसेवकांनी काही राज्यांत घरोघरी जाऊन संपर्क केला होता. तोच प्रयोग विधानसभा निवडणुकीत केला जाणार आहे. संघ परिवारात जास्तीत जास्त प्रशिक्षित व कुशल कार्यकर्ते घडावे यासाठी प्रयत्न करण्यात यावा, असा सूर बैठकीत दिसून आला. (प्रतिनिधी)
 
नेत्यांचा ‘दक्ष’ पवित्र
च्‘लोकमत’ प्रतिनिधीने बैठकस्थळी जाऊन यासंदर्भात माहिती घेतली असता गोवा, गुजरात सोबतच कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडय़ातील प्रांत प्रचारकांची उपस्थिती दिसून आली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, भाजयुमोच्या प्रदेशाध्यक्ष पंकजा पालवे-मुंडे हेदेखील प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीसंदर्भात संघाच्या पदाधिका:यांशी प्रतिक्रियेसाठी संपर्क करण्यात आला. परंतु कोणीही प्रतिक्रिया दिली नाही. भाजपाच्या पदाधिका:यांनीदेखील ही ठराविक काळाने घेण्यात आलेली बैठक होती, असे सांगून ‘मौन’ बाळगणोच पसंत केले.