शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

‘आबा’ नावाची क्रेझ अस्ताला जाताना...

By admin | Updated: February 17, 2015 00:26 IST

ग्रामस्वच्छता स्पर्धा, डान्सबार बंदीचा निर्णय आणि नंतर तंटामुक्ती स्पर्धा यामुळं त्यांची क्रेझ निर्माण झाली. तब्बल २५ वर्षे विधानसभेत असणाऱ्या आबांची क्रेझ अखेरपर्यंत होती.

रावसाहेब रामराव पाटील हे नाव कुणाचं आहे, हे १९९० ते ९५च्या दरम्यान फारसं समजत नव्हतं, पण त्याचवेळी त्याच नावाचा ‘आर. आर. पाटील’ हा शॉर्टफॉर्म मात्र महाराष्ट्राच्या विधिमंडळात गाजत होता. १९९५ नंतर त्या शॉर्टफॉर्मआधी ‘लक्षवेधीकार’ हे विशेषण आलं आणि ९९ नंतर तर ग्रामविकासमंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री अशा पदांमुळं या नावाची ‘क्रेझ’ निर्माण झाली. मुंबईतल्या उपनगरांपासून गावाकडच्या वाड्यावस्त्यांपर्यंत ही ‘क्रेझ’ पोहोचली. या दरम्यान ती ‘आबा’ या दोन अक्षरांभोवती अलवार फिरू लागली होती... हम आह भी भरते हैं तो हो जाते हैं बदनाम,वो कत्ल भी करते हैं तो चर्चे नही होते...हा शेर आबा अनेकदा ऐकवायचे. निमित्त काहीही असायचं... कधी २६/११चा अतिरेक्यांचा हल्ला असायचा, तर कधी आबांनी गृहमंत्री असताना गुन्हेगारांच्या मांडीला मांडी लावून इफ्तार पार्टी साजरी केल्याची बातमी असायची... यंदा विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला पाच-सहा दिवस राहिले असताना आबांनी प्रचारसभेत वादग्रस्त वक्तव्य केलं आणि गदारोळ उठला. त्यापूर्वी अतिरेकी हल्ल्यानंतर ‘बडे बडे शहरोंमें छोटे छोटे हादसे होते हैं’ हे त्यांचं विधान वादग्रस्त बनलं होतं. त्याचा विपर्यास कसा झाला, हेही आबा सांगायचे. संभाषणचातुर्य व बोलण्यातली आपुलकी हे गुण आईकडून आबांकडे आलेले. त्यांचं वक्तृत्त्व हा अनेकांचा अप्रूपाचा विषय ठरला. कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांनी घोटून-घोटून वक्तृत्वशैली आत्मसात केली होती. अंगी हजरजबाबीपणा होताच, त्याला अभ्यासाची जोड मिळाली. अतिशय शांतपणे व साध्या शैलीतलं बोलणं, हा शिरस्ता. निबंध लिहिल्यासारखी वाक्यं. एकामागून एक. त्यांचीही एक विशिष्ट लय. चढउतार ठरलेला. कुठंही अडखळणं नाही, की जडव्याळ शब्दांचा भडिमार नाही. भावनिक आवाहन करत लोकांच्या काळजाला हात घालण्याची हातोटी केवळ लाजवाब होती. २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबईवरील हल्ल्यानंतर आबांना गृहमंत्रिपद सोडावं लागलं. शिवराज पाटलांनी केंद्रीय गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. लगेच आबांनी अंतरात्मा जागा झाल्याचं सांगत मंत्रिपदाचा राजीनामा दिला. ‘चित्रकूट’वरून ते ‘स्कोडा’नं निघाले आणि तासगावात पोहोचले. गेस्ट हाऊसवर तुफान गर्दी होती. तिथं त्यांना भेटायला गेलो होतो. चेहऱ्यावरचा तणाव जाणवत होता. पण शांत ‘स्टाईल’मध्ये बोलत होते. स्वयंभू, स्वयंप्रज्ञ आणि स्वाभिमानी नेतेपणाची झाक दिसत होती. काही दिवसांतच ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बनले आणि निवडणुका लागल्या. कटुता विसरून पायाला भिंगरी बांधून प्रचार केला. विधानसभेच्या २००४ आणि २००९ या दोन्ही निवडणुकांवेळी ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होते. १९९९ आणि २००४च्या निवडणुकीत संजयकाका पाटील यांनी आबांना आव्हान दिलं. त्या निवडणुकीचा व मतदानादिवशीचा थरार मी अनुभवलाय. स्कॉर्पिओतून आलेल्या सात-आठ पैलवानांसोबत काकांची एन्ट्री झाली की, अधिकारीही टरकत! मतदान केंद्रावर सन्नाटा पसरायचा! या प्रकाराला आबांनी मात्र शांतपणे तोंड दिलं. पुढं आबाही आक्रमक झाले. आबा-काका गटांतील संघर्ष हाणामाऱ्यांवर गेला. अखेर आबांनीच समेटाचे प्रयत्न केले. काकांना राष्ट्रवादीत आणून विधान परिषदेची आमदारकी दिली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आबांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेऊन त्यांना छाननीतच बाद करण्याचा डाव होता. जेव्हा आबांना ‘आॅब्जेक्शन’ घेतल्याचं कळलं, तेव्हापासून अर्ज शाबूत ठरल्याचं समजेपर्यंतच्या अडीच तासांच्या ताणतणावांचा मी साक्षीदार बनलो. तणाव असतानाही आबांचा संयम बिलकुल सुटला नव्हता. सांगलीत जानेवारी २००८मध्ये झालेलं मराठी साहित्य संमेलन आबांनी खेचून आणलं. स्वागताध्यक्षपद त्यांच्याकडेच जाणार असं वाटत असतानाच आबांनी चातुर्यानं स्वागताध्यक्षपदी लेखक, पत्रकार उत्तम कांबळेंच्या नावाची घोषणा केली. स्टेजवर बसण्यास फाटा देऊन, राजकारणी मंडळी साहित्याच्या मंचावर कशाला, या प्रश्नाला उत्तर देऊन टाकलं. संमेलनाचा खर्च दोन-अडीच कोटीवर गेला, पण आबांनी हिकमतीनं सगळं जुळवून आणलं. युती शासनाच्या काळात विरोधी पक्षाचे आमदार म्हणून आबांनी सभागृह गाजवून सोडलं. ते बोलायला उभे राहिले की, युती सरकारचे मंत्री हडबडत. आबांचा प्रश्न म्हटल्यावर गृहपाठ करूनच जावं लागायचं, असं खुद्द मुंडेंनीच कबूल केलं होतं. वक्तृत्वासोबत स्वच्छ प्रतिमा ही त्यांची जमेची बाजू. जिल्हा परिषद सदस्य असताना मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी दिलेली जीप अजूनही अंजनीतल्या त्यांच्या घरापुढं उभी आहे. ग्रामस्वच्छता स्पर्धा, डान्सबार बंदीचा निर्णय आणि नंतर तंटामुक्ती स्पर्धा यामुळं त्यांची क्रेझ निर्माण झाली. तब्बल २५ वर्षे विधानसभेत असणाऱ्या आबांची क्रेझ अखेरपर्यंत होती. श्रीनिवास नागे