शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये वाढदिवसावरून हाणामारी

By admin | Updated: June 13, 2016 05:02 IST

माजी नगरसेवक आणि एका स्थानिक नेत्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावरून झालेल्या वादाचे पर्यावसान थेट हाणामारी आणि तोडफोडीत झाले.

अहमदनगर : एक माजी नगरसेवक आणि एका स्थानिक नेत्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावरून झालेल्या वादाचे पर्यावसान थेट हाणामारी आणि तोडफोडीत झाले. शनिवारी रात्री अकरा वाजता झालेल्या घटनेत नऊ ते दहा मोटारसायकली आणि दोन चारचाकी वाहनांचा चुराडा झाला तर चार जण जखमी झाले. त्यातील एका जखमीला पुणे येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते व माजी नगरसेवक धनंजय जाधव यांच्या वाढदिवसाचा शनिवारी रात्री तोफखाना भागात कार्यक्रम सुरू असताना जमावाने त्यांचा कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. या भागात वाढदिवस साजरा करायचा नाही, कार्यक्रम ताबडतोब बंद करा, असे सांगत जमावाने शिवीगाळ, दमदाटी केली. त्यांच्यापैकी सूरज जाधव याने केलेल्या तलवारीच्या वारात माजी नगरसेवक धनंजय जाधव यांचे काका प्रताप दत्तात्रय जाधव हे जखमी झाले. त्यानंतर जमावाने दांडके, हॉकीस्टिकने वाहनांची तोडफोड केली.चैतन्य दिलीप जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सूरज सुभाष जाधव, संदीप सुभाष जाधव, सुशांत सुभाष जाधव, अक्षय किरण आडेप, संदीप गड्डा यांच्यासह २५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दुसरी फिर्याद रविवारी दुपारी दाखल झाली. अर्जुन नरसिंग जज्जर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अभिमन्यू राजू जाधव, धनंजय कृष्णा जाधव (माजी नगरसेवक) आदी १० ते १२ जणांनी माळ््याची चावडी येथे येऊन मारहाण केली. बाहेरच्या लोकांचा (स्थानिक नेत्याचा) वाढदिवस आपल्या गल्लीत कसा काय साजरा करता?, अशी विचारणा करीत आरोपींनी बंदुकीच्या बटाने तसेच लाकडी दांडके आणि चाकूने मारहाण केली. मारहाणीत अर्जुन नरसिंग जज्जर, सुशांत जाधव, सूरज जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत. माजी नगरसेवक धनंजय जाधव यांच्यासह २५जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)