शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शिल्पसृष्टीला मुहूर्तच सापडेना!

By admin | Updated: April 14, 2015 01:08 IST

बाबासाहेबांच्या कार्याची जगाला ओळख व्हावी यासाठी त्यांच्या मूळ आंबडवे गावी ५ कोटी रुपये खर्चून शिल्पसृष्टी उभी करण्याचा निर्णय २००९मध्ये आघाडी सरकारने घेतला होता.

आंबडवे दुर्लक्षित : मूळ गावाला विकासाची प्रतीक्षाशिवाजी गोरे -दापोली बाबासाहेबांच्या कार्याची जगाला ओळख व्हावी यासाठी त्यांच्या मूळ आंबडवे गावी ५ कोटी रुपये खर्चून शिल्पसृष्टी उभी करण्याचा निर्णय २००९मध्ये आघाडी सरकारने घेतला होता. मात्र, पाच वर्षे होऊनही शिल्पसृष्टीचे नियोजन करण्यासाठी सरकारला मुहूर्तच मिळालेला नाही.कोकणच्या विकासाला गती देण्यासाठी २४ जून २००९ रोजी सिंधुदुर्ग येथे मंत्रिमंडळाची विशेष बैठक झाली होती. त्यात डॉ. आंबेडकर यांच्या मूळ गावी आंबडवे (ता. मंडणगड) येथे बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित शिल्पसृष्टी उभारण्याचा निर्णय झाला. त्यानंतर तत्कालीन ग्रामविकासमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांनी आंबडवे येथे भेट दिली. स्मारक व शिल्पसृष्टीसाठी आवश्यक असलेल्या जागेची पाहणी केली असता सपकाळ (आंबेडकर) कुटुंबीयांनी जागा उपलब्ध करून देण्याचे मान्य केले. बाबासाहेबांच्या स्मारकाशेजारील ३६ गुंठे जागा शिल्पसृष्टीसाठी नियोजित करण्यात आली. १४ मार्च २०१२ रोजी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत समिती स्थापन झाली. सुदर्शन सपकाळ, नरेंद्र सपकाळ, नथुराम सपकाळ, अल्पेश सपकाळ (आंबेडकर) कुटुंबीय बैठकीला उपस्थित होते. त्यात कामाला सुरुवात करण्याबाबत चर्चाही झाली. मात्र त्यानंतर वारंवार पाठपुरावा करूनही शासनाकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे नथुराम सपकाळ यांनी सांगितले. बाबासाहेबांच्या मूळ गावी मोठे ग्रंथालय आवश्यक आहे. तसेच शिल्पसृष्टीमुळे येथे येणाऱ्या प्रत्येकाला बाबासाहेबांचा जीवनपट कळेल. येथे सद्य:स्थितीत स्मारकाशिवाय काहीही नाही. आंबडवे येथे त्यांची भावकी आंबेडकर म्हणजे आताचे सपकाळ कुटुंबीय राहतात. बाबासाहेबांबद्दल त्यांना प्रचंड आदर आहे. बाबासाहेबांच्या उपक्रमासाठी लागणारी जमीन दान देऊन त्यांनी पहिले पाऊल टाकले आहे. मात्र सरकारला शिल्पसृष्टीसाठी अजून मुहूर्त मिळालेला नाही.२५ आॅगस्ट २००९ रोजी शिल्पसृष्टी उभारण्याचे परिपत्रक निघाले होते. मात्र त्यापुढे काही झाले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रश्नी लक्ष घालावे.- प्रीतम रुके,आरपीआय, जिल्हा सरचिटणीसआंबडव गावाला भेट देणाऱ्या अनुयायांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही. येथील शिल्पसृष्टी पूर्ण व्हावी, यासाठी पुढाकार घेऊ.- आ. संजय कदम, दापोलीबाबासाहेबांच्या मूळ गावी मोठे ग्रंथालय आवश्यक आहे. तसेच शिल्पसृष्टीमुळे येथे येणाऱ्या प्रत्येकाला बाबासाहेबांचा जीवनपट कळेल. येथे सद्य:स्थितीत स्मारकाशिवाय काहीही नाही.संतांच्या नावे पैसा जमवला असल्यास त्याचा विनियोग सत्पात्री व्हावा, आपल्या सभोवताली दैन्य, दारिद्य्र, अज्ञान, रोगराई पसरली आहे़ त्यामुळे अशा पैशाचा सदुपयोग हे दु:ख, अज्ञान दूर करण्याकरिता केला जावा, असे मत डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी साठ वर्षींपूर्वी व्यक्त केले होते़