शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

‘माकपा’ची आक्रमक भूमिका

By admin | Updated: August 3, 2015 01:14 IST

जमीन अधिग्रहण विधेयक कोणत्याही परिस्थितीत राज्यसभेत मंजूर होऊ दिले जाणार नाही. कष्टकरी, शेतकरी आणि सर्वसामान्यांचा अधिकार हिरावून घेणारे

अलिबाग : जमीन अधिग्रहण विधेयक कोणत्याही परिस्थितीत राज्यसभेत मंजूर होऊ दिले जाणार नाही. कष्टकरी, शेतकरी आणि सर्वसामान्यांचा अधिकार हिरावून घेणारे भाजपा सरकार हे बहिरे झाले आहे. त्यांना जनतेचा आवाज ऐकविण्यासाठी २ सप्टेंबरला सर्वांनी रस्त्यावर उतरून भारत बंद करा, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस खासदार सीताराम येचुरी यांनी केले.जनतेचा अधिकार हिरावून घेत गरीब आणि धनिकांसाठी अशा दोन भारतांची निर्मिती करणाऱ्या भाजपा सरकारला रोखण्यासाठी डाव्या विचारांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा ६८ वा वर्धापनदिन अलिबाग येथील समुद्र किनारी पार पडला. त्या वेळी खासदार येचुरी बोलत होते. आपल्या २० मिनिटांच्या भाषणात खासदार येचुरी यांनी मोदी सरकारवर जबरदस्त तोफ डागली. मोदी सरकार भारतामध्ये ज्या नीती लागू करीत आहे त्या शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांचा विरोधातील आहेत. त्यांची आर्थिक नीती देशासाठी अतिशय घातक आहेत. निवडून येण्यापूर्वी जनतेला दिलेली आश्वासने मोदी सरकारने पाळलेली नाहीत. राज्यसभेत फक्त एकदाच ते उपस्थित राहिले आहेत. त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काही देणे-घेणे नाही. परदेशातील काळा पैसा परत आणण्याची भाषा केली जात आहे, परंतु आधी परदेशात गेलेल्या मोदींना परत आणा अशी कोपरखळी खासदार येचुरी यांनी मोदींच्या सततच्या परदेशवारीविरोधात लगावली. पाच लाख करोड रुपयांची करामध्ये भांडवलदारांना मोदी सरकार सूट देत आहे, तर दुसरीकडे गरिबांची सबसिडी काढून घेत आहे. देशात पैशाची कमी नसून योग्य नीतीची आवश्यकता आहे. यासाठी देशात तिसरी आघाडी करावीच लागणार असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)