शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘कोविड-१९’चे संकट : न्यायपालिकेच्या नजरेतून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 06:00 IST

‘कोविड-१९’च्या संकटाशी झगडताना सर्व भारतीय नागरिक, उद्योग व्यवसाय तसेच न्यायपालिकांसारख्या घटनेने स्थापन केलेल्या संस्थाही एकत्र आल्याचे दिसत आहे.

‘कोविड-१९’च्या संकटाशी झगडताना सर्व भारतीय नागरिक, उद्योग व्यवसाय तसेच न्यायपालिकांसारख्या घटनेने स्थापन केलेल्या संस्थाही एकत्र आल्याचे दिसत आहे. देशव्यापी ‘लॉकडाऊन’दरम्यान सर्वोच्च न्यायालयापासून ते कनिष्ठ न्यायालयापर्यंत सर्वांनीच काम बंद ठेवून केवळ अत्यंत तातडीची प्रकरणे हाताळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातही प्रत्यक्ष वकील व पक्षकार हजर न करता प्रकरणांची व्हिडिओद्वारे सुनावणी केली जात आहे. तातडीच्या कारणांशिवाय न्यायालयात येणाऱ्यांना मोठा दंड ठोठावला आहे. जेणेकरुन न्यायालयात गर्दी होणार नाही.हे चालू असतानाच सर्वोच्च न्यायालयाने काही ऐतिहासिक व महत्त्वाचे निर्णयही दिले आहेत. २३ मार्चला सर्वोच्च न्यायालयाने एक अभूतपूर्व निकाल दिला.‘कोविड-१९’च्या संकटामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत न्यायालयांचे कामकाज अगदी मर्यादित होणार आहे, जवळपास ते ठप्पच होणार आहे, हे पाहता अनेक पक्षकारांची न्यायालयात अर्ज़, याचिका, दावे दाखल करण्यासाठीची मुदत निघून जाऊ शकते. याचा विचार करीत सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या कलम १४२/१४१ ने दिलेल्या विशेष अधिकाराचा वापर करून अशी मुदत १५ मार्चपासून पुढील आदेश येईपर्यंत स्वअधिकारात (२४ङ्म ेङ्म३ङ्म) वाढविली आहे.‘सद्यस्थितीत सर्वोच्च न्यायालय हे सरकारपेक्षा जास्त चांगला धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाही,’ असे सांगून सर्वोच न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठाने ७ एप्रिल रोजी ‘कोविड-१९’च्या प्रतिबंधासाठी केलेल्या लॉकडाऊनदरम्यान स्थलांतरित कामगारांना किमान वेतन सरकारने द्यावे, या विषयावर दाखल केलेल्या जनहित याचिकेवर कोणताही आदेश पारित करण्यास नकार दिला.‘आर्थिक दुर्बलतेमुळे कोणत्याही भारतीयाची ‘कोविड-१९’ची चाचणी राहू नये, यासाठी सर्व भारतीय नागरिकांना शासकीय अथवा मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळेत ‘कोविड-१९’ची चाचणी मोफत उपलब्ध करून द्यावी, असा अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या दुसºया खंडपीठाने दिला आहे. आता यापुढील सुनावणीत हा खर्च कोणी सोसायचा, याविषयी काय आदेश होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या सर्व सुनावण्या व्हिडिओद्वारे होत आहेत.थोडक्यात, या विश्वव्यापी संकटाचा सामना करण्यासाठी न्यायपालिकादेखील सरसावली आहे. आता न्यायपालिका दिवसेंदिवस जास्त गंभीर होणाºया या परिस्थितीत तटस्थतेची भूमिका घेते, की वेळप्रसंगी हस्तक्षेप करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.- अ‍ॅड. अभय आपटे(लेखक ज्येष्ठ विधिज्ञ आहेत.)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या