राजगुरुनगर : साबुर्डी (ता. खेड) येथील एका विवाहितेवर तिच्या चुलत सासर्यानेच बलात्कार केल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक महिन्यापूर्वी ही विवाहिता तिच्या राहत्या घरात झोपली असता, आरोपी रात्री एक वाजता तिथे घुसला. त्याने तिच्या पतीला व बाळाला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. मागील आठवड्यात पुन्हा अशीच धमकी देऊन तिचा विनयभंग केला. तिने काल फिर्याद दिली. आरोपीवर भादंवि ३७६,४०६ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक एस. जे. वायदंडे तपास करीत आहेत.
चुलत सासर्याचा विवाहितेवर बलात्कार
By admin | Updated: May 7, 2014 21:25 IST