शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालये पक्षकारांसाठी आहेत, वकिलांसाठी नाहीत

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

राज्यातील न्यायालयांच्या इमारतींच्या दुरवस्थेबाबत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. वारंवार बजावूनही सरकार न्यायालयांच्या इमारतींसाठी काही करणार

मुंबई : राज्यातील न्यायालयांच्या इमारतींच्या दुरवस्थेबाबत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. वारंवार बजावूनही सरकार न्यायालयांच्या इमारतींसाठी काही करणार नसेल, तर बार असोसिएशनने न्यायालयांवर बहिष्कार घालावा. त्यामुळे किमान राज्य सरकारचे लक्ष तरी वेधले जाईल, अशी टीका उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर केली. न्यायालये न्यायाधीश किंवा वकिलांसाठी नाहीत तर पक्षकारांसाठी आहेत, अशा शब्दांत सरकारला चपराक लगावली.कनिष्ठ न्यायालयांच्या मोडकळीस आलेल्या इमारतींबाबत दोन खंडपीठांपुढे तीन वेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. शुक्रवारच्या सुनावणीवेळी दोन्ही खंडपीठांनी राज्य सरकारच्या उदासीन वृत्तीवर ताशेरे ओढले.माझगाव न्यायालयाच्या इमारतीसंदर्भात माझगाव बार असोसिएशनने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी न्या. एस.सी. धर्माधिकारी व गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती.राज्यातील सर्व न्यायालयांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी सरकारने एकूण ४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र त्यापैकी माझगाव न्यायालयाच्या इमारतीसाठी ३७५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. आतापर्यंत सरकारने केवळ १० कोटी रुपयेच मंजूर केले आहेत, अशी माहिती बार असोसिएशनतर्फे उदय वारुंजीकर यांनी खंडपीठाला दिली.तर अन्य दोन याचिकांवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. प्रकाश देव यांच्या खंडपीठापुढे होती.दादर मेट्रोपोलिटन न्यायालयाच्या इमारतीची पुनर्बांधणी करण्यासंदर्भातही उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर तातडीने उपाय शोधा, अन्यथा विशेष अधिकारांचा वापर करून हे न्यायालय बंद करण्याचा आदेश द्यावा लागेल, अशा इशारा खंडपीठाने सरकारला दिला.‘न्यायालयाच्या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी सरकारला भूसंपादन करावे लागेल आणि हाच एक मोठा अडथळा आहे. न्यायालयाच्या इमारतीच्या बाजूची जमीन खासगी आहे. त्यामुळे ती जमीन संपादन करण्यासाठी आणखी काही काळ लागेल,’ असे अ‍ॅड. हितेन वेणेगावकर यांनी सरकारतर्फे खंडपीठाला सांगितले.‘राज्य सरकारने या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे. या समस्येकडे दुर्लक्ष करता येणार नाही अन्यथा या न्यायालयाची स्थितीही माझगाव न्यायालयासारखी व्हायची. माझगाव न्यायालयाची इमारत धोकायदायक जाहीर करून खाली करण्याचा आदेश दिल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत १२ कोर्ट रूम खाली करण्यात आल्या. दादरच्या न्यायालयाबाबतही सरकारने काहीच केले नाही, तर आम्हाला हेही न्यायालय बंद करावे लागले,’ असा इशारा उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला. या याचिकेवरील सुनावणी ७ एप्रिल रोजी ठेवत खंडपीठाने पुढील सुनावणीस प्रभारी महाअधिवक्ता प्रकाश देव यांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)सरकार लक्ष कधी घालणार?‘न्यायालये न्यायाधीश व वकिलांसाठी नाहीत. न्यायालये पक्षकारांसाठी आहेत. जर राज्य सरकारला काही करण्यात स्वारस्य नसेल तर बार असोसिएशनने न्यायालयांवर बहिष्कार घालावा, कदाचित या मार्गाने तरी सरकारचे लक्ष या मुद्द्याकडे वेधले जाईल,’ असा टोला उच्च न्यायालयाने सरकारला लगावला.