शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामे नियमित करण्यावर कोर्टाचे प्रश्नचिन्ह

By admin | Updated: April 27, 2016 06:31 IST

राज्यभरातील बेकायदा बांधकामे नियमित करण्याच्या सरकारच्या प्रस्तावित धोरणावर उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह निर्माण केले

मुंबई : राज्यभरातील बेकायदा बांधकामे नियमित करण्याच्या सरकारच्या प्रस्तावित धोरणावर उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह निर्माण केले असून, राज्य सरकारने हे धोरण आखण्यापूर्वी ‘इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी’ केला का? शहरांच्या नागरी सुविधांवर याचा किती परिणाम होईल, याचा विचार सरकारने केला का? असे सवाल करत, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. नवी मुंबईतील दिघा, पिंपरी-चिचवड, कल्याण-डोंबिवली इत्यादी ठिकाणांतील बेकायदा बांधकामे पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने वेगवगेळ्या जनहित याचिकांच्या निकालाद्वारे दिले आहेत. या पार्श्वभूमीवर दिघा बेकायदा बांधकामप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर, उच्च न्यायालयाने राज्यभरातील बेकायदा बांधकामे नियमित करण्याचे धोरण आखण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला काही महिन्यांपूर्वी दिली. त्या वेळी उच्च न्यायालयाने हे धोरण न्यायालयाच्या परवानगीनेच अंतिम करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार, राज्य सरकारने राज्यातील बेकायदा बांधकामे नियमित करण्यासंदर्भात धोरण आखले. हे धोरण न्या. अभय ओक व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे सादर करण्यात आले. (प्रतिनिधी) घटनेशी विसंगत धोरणहे प्रस्तावित धोरण घटनेच्या अनुच्छेद १४ शी विसंगत असून, सरकारने सरसकट सगळ्यांनाच अभय दिले आहे. बेकायदा बांधकामांना संरक्षण देण्यासाठी सरकार आरक्षित भूखंडाचे आरक्षणही हलवत आहे. सरकारचे हे धोरण एमआरटीपी कायद्याविरुद्ध आहे आणि न्यायालय ते कदापि सहन करू शकत नाही. - उच्च न्यायालयझोपडपट्ट्या नियमित करण्याचा निर्णय घेतला कसा?च्उच्च न्यायालयाने सरकारने या धोरणाद्वारे बेकायदा झोपडपट्ट्यांनाही नियमित करण्याचा निर्णय घेतल्याने सरकारची खरडपट्टी काढली. ‘याच न्यायालयाने २००० पर्यंतच्या बेकायदा झोपडपट्ट्या नियमित करण्याची सरकारची विनंती मान्य केली होती. मात्र, यापुढे मुदत वाढवायची असल्यास न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल, असे स्पष्ट केले होते. मग तुम्ही २०१५ पर्यंतच्या झोपडपट्ट्या नियमित करण्याचा निर्णय घेतला कसा?’ असे म्हणत, उच्च न्यायालयाने सरकारच्या धोरणासंदर्भातील निकाल बुधवारपर्यंत राखून ठेवला.