शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

युतीचा निर्णय मुख्यमंत्री आणि भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या कोर्टात

By admin | Updated: January 22, 2017 20:34 IST

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा- सेना युतीच्या निर्णयावर अद्यापही शिक्कामोर्तब झालं नाही.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 22 - मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा- सेना युतीच्या निर्णयावर अद्यापही शिक्कामोर्तब झालं नाही. याआधीही युतीसंदर्भात भाजपा आणि सेना नेत्यांदरम्यान तीन बैठक झाल्या. मात्र त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. उलट भाजपा आणि सेना नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक करणं सुरूच ठेवले आहे. भाजपाने शिवसेनेला 50-50चा फॉर्म्युला दिला होता. मात्र तो फेटाळत शिवसेनेनं भाजपाला 60 जागांचा प्रस्ताव दिला. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून चांगलाच कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळाला. त्यासंदर्भातच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपा नेत्यांची जवळपास 4 तास आढावा बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई भाजपाच्या निवडणूक समिती, आमदार आणि खासदार यांच्याकडून संघटन आणि निवडणूक कामाचा आढावा घेतला. बैठकीत 227 जागांचा वॉर्डनिहाय, बुथनिहाय आढावा घेण्यात आला असून, भाजपाचा जाहीरनामा, उमेदवार, पुढील रणनीतीबाबत चर्चा करण्यात आली आहे. राज्यातील पदाधिकाऱ्यांची रात्री 9 वाजता पुन्हा बैठक होत आहे. युतीबाबत भाजपा आश्वासक असून याबाबत पुढील निर्णय मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे घेतील, असंही आशिष शेलार म्हणाले आहेत. आतापर्यंत तीन बैठका पार पडल्या आहेत. मात्र अद्याप दोन्ही पक्षांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांची नेमकी भूमिका काय, याबाबतही जनतेच्या मनात संभ्रम कायम आहे.