शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

त्यांच्यासाठी न्यायालयच आले खाली

By admin | Updated: July 8, 2017 22:22 IST

महालोकअदालतीमध्ये अपंग असलेल्या ज्येष्ठ महिलेला न्याय देण्यासाठी न्यायालयच दोन मजले उतरून खाली आले

ऑनलाइन लोकमत
 
अपंग महिला : महालोकअदालतीत मिळाला न्याय  
 
पुणे, दि. 8 - न्याय मिळविण्यासाठी एरवी पक्षकारांना न्यायालयाची पायरी चढावी लागते. मात्र, महालोकअदालतीमध्ये अपंग असलेल्या ज्येष्ठ महिलेला न्याय देण्यासाठी न्यायालयच दोन मजले उतरून खाली आले. तिचे म्हणणे ऐकून घेऊन तिलाही न्यायही दिला. न्यायालयाची एक वेगळी बाजू शनिवारी झालेल्या महालोकअदालतमध्ये पक्षकारांना पाहायला मिळाली. 
 
हौसाबाई छबू पशाले (वय ६०, रा. आढळे खुर्द, ता. मावळ) असे न्याय मिळालेल्या त्या महिलेचे नाव आहे. हौसाबाई ११ मार्च २०१५ रोजी नातेवाईकाच्या लग्नासाठी कारमधून कुटुंबियांसोबत निघाल्या होत्या. त्यावेळी समोरून येणाºया इनोव्हा गाडीने त्या कारला धडक दिली. त्यामध्ये हौसाबाई गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या मणख्याला दुखापत झाली. उपचारावर मोठा खर्च केला. तरीही त्यांना चालता येत नव्हते. नीट बसता येत नव्हते. त्यांनी ९ लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, यासाठी अ‍ॅड. तुषार पाचपुते यांच्यामार्फत १७ जून २०१५ रोजी येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला होता.  मात्र, अपंगत्वामुळे हौसाबाई यांना न्यायालयात हजर राहणे शक्य नव्हते. याबाबतची माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला देण्यात आली होती. शनिवारी महालोकअदालतमध्ये कारमधून हौसाबाई यांना शिवाजीनगर न्यायालयातील नवीन इमारतीच्या समोर हजर करण्यात आले. त्यावेळी दुसºया मजल्यावर त्यांना नेणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी पॅनेलचे सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी, हर्षदा वैद्य, प्राजक्ता कुलकर्णी दुसºया मजल्यावरून खाली उतरून नवीन इमारतीच्या पुढे आले. हौसाबाई यांचे म्हणणे जाणून घेतले. तडजोडीअंती त्यांना ६ लाख ५० हजार रुपये देण्याचे मान्य करण्यात आले. त्यावेळी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पी.आर.अष्टुरकर, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड़ राजेंद्र दौंडकर, विशेष न्यायाधीश एम.डब्ल्यू. चांदवाणी, विशेष न्यायाधीश जे.टी.उत्पात, न्यायमूर्ती एस.एच. ग्वालानी, न्यायमूर्ती ए. एस. महात्मे, न्यायमूर्ती जहागिरदार, अर्जदाराचे वकील तुषार पाचपुते, अ‍ॅड. मयुर खांडरे, रिलायन्स कंपनीकडून अ‍ॅड. हृर्षिकेश गानू उपस्थित होते. हा खटला तडजोडीने लवकरात लवकर सुटावा, यासाठी रिलायन्स कंपनीनेही पुढाकार घेतला होता. कंपनीचे अधिकारी जून महिन्यात मुंबई येथून पुणे येथे आले होते, असे अ‍ॅड़ गानू यांनी सांगितले.