शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा देशव्यापी मागणी दिवस

By admin | Updated: July 10, 2017 02:32 IST

अखिल भारतीय अंगणवाडी सेविका व मदतनीस फेडरेशनचा देशव्यापी मागणी दिवस १० जुलै रोजी साजरा केला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अखिल भारतीय अंगणवाडी सेविका व मदतनीस फेडरेशनचा देशव्यापी मागणी दिवस १० जुलै रोजी साजरा केला जाणार आहे. मागणी दिनानिमित्त अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या मुंबई जिल्हा समितीने सोमवारी आझाद मैदानात निदर्शनांची हाक दिली आहे.या आंदोलनात संपूर्ण मुंबई शहरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस दुपारी ३ वाजता आझाद मैदानात निदर्शने करतील, अशी माहिती संघटनेच्या राज्य महासचिव शुभा शमीम यांनी दिली. त्या म्हणाल्या की, आयसीडीएस योजना कायम करून तिचा दर्जा सुधारण्याची कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे, तसेच अंगणवाडी सेविका, मदतनिसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याचे आवाहन संघटनेने केले आहे. दरम्यान, मानधनवाढ समिती व कृती समितीच्या शिफारशीनुसार मानधनवाढ मंजूर करण्याची मागणीही समितीने केली आहे. मागणी दिनानिमित्त शासनाने पुढाकार घेऊन ठरल्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना मानधनवाढीची भेट द्यावी, असे आवाहन शमीम यांनी केले आहे. सोबतच शासनाने टीएचआर (टेक होम रेशन) बंद करून, सर्व लाभार्थ्यांना ताजा शिजवलेला आहार द्यावा. मुले टीएचआर खात नसून फेकून देत असल्याचे कित्येक वेळा समितीने सिद्ध करून दाखवले आहे. तरीही शासनाने टीएचआरचा बालहट्ट सोडून मुलांना ताजा शिजविलेला आहार देण्याचे आवाहन समितीने केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, अंगणवाडीत दोन वेळच्या आहारासाठी सध्या प्रतिविद्यार्थी फक्त ४ रुपये ९२ पैसे इतका निधी खर्च केला जात असून, हा दर अपुरा आहे. तरी या दरात तिपटीने वाढ करण्याची मागणी संघटनेने केली आहे.