शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

देशातील सर्वात उंच निवडुंगाला फुटला कोंब!

By admin | Updated: April 6, 2017 19:13 IST

देशातील सर्वात उंच निवडुंग म्हणून लिमका बुक आॅफरेकार्डमध्ये नोंद झालेल्या महाबळेश्वरातील झाडाला नुकताच नवीन कोंब फुटला आहे.

आॅनलाइन लोकमतमहाबळेश्वर (सातारा), दि. 6  : देशातील सर्वात उंच निवडुंग म्हणून लिमका बुक आॅफरेकार्डमध्ये नोंद झालेल्या महाबळेश्वरातील झाडाला नुकताच नवीन कोंब फुटला आहे. सुमारे ४७ फूट उंच असलेल्या व दिवसेंदिवस वार्धक्याकडे झुकू लागलेल्या या लिमका बुक वीरास त्याच्या नवीन कोंबासह पाहण्यासाठी निसर्गप्रेमी व अभ्यासकांची गर्दी होत आहे.महाबळेश्वर येथील शासकीय दुग्ध शाळेच्या आवारात त्यांच्याच विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारावर उंच वाढलेले निवडुंग आहे. तो ३७ फूट उंचीचा असताना २००७ मध्ये तत्कालीन दुग्धशाळेचे व्यवस्थापक निवडुंगाचे पालक हनमंतराव नलवडे, सुनील राशिनकर, बाबू ढेबे-माळी, नामदेव मोरे यांनी लिमका बुक आॅफरेकार्ड कार्यालयाशी संपर्क साधून ३७ फूट वाढलेल्या या निवडुंगाची माहिती व फोटो पाठविले. माहितीची शहानिशा व खात्री झाल्यावर त्याची देशातील सर्वात उंच निवडुंग म्हणून नोंद झाली. यापूर्वी लिमका बुकमधील २९ फूट उंच निवडुंगाचा उंच निवडुंग म्हणून विक्रम होता. तो मोडून महाबळेश्वरच्या या ३७ फूट उंच निवडुंगाने सर्वात उंच निवडुंग म्हणून बहुमान मिळविला. त्यानंतर हा विक्रम कायम आहे. एवढे करूनही तो थांबला नाही. आकाशात उंच-उंच गवसणी घेण्याची त्याची ओढ कायमच आहे. तो आत्ता ४७ फूट उंच झाला आहे. त्याला उन्हाळी हंगामात ब्रह्मकमळासारखी मोठी व पांढरी शुभ्र भरपूर फुले येतात. त्यावेळेसही तो अत्यंत विलोभनीय दिसतो.निसर्ग नियमानुसार आता हा ह्यलिमका वीरह्ण वार्धक्याकडे झुकू लागला आहे. या विक्रमवीराने तीन नवीन कोबांना जन्म दिला असून, ते मूळ निवडुंगाच्या तळातून फुटल्याने त्यांच्या बद्दलचे कुतूहल वाढले आहे. भविष्यात हे कोंबही उंचीचा वारसा जपणार का? याचे कुतूहल पर्यावरणप्रेमींना वाटत आहे. तो आपल्याच सध्याचा उंचीचा विक्रम मोडेल त्यावेळी आम्ही ही त्याच्या बालपणाचे साक्षीदार आहोत, हे अभिमानाने सांगता यावे, यासाठी निसर्गप्रेमी व अभ्यासकांची ते पाहण्यास व त्याची आपल्या समवेत छबी काढण्याची येथे येत आहेत. कारण वीस वर्षांपूर्वी दुग्धशाळा विश्रामगृह परिसरात आलेले निवडुंगाचे कोंब तो एवढा उंच वाढून होईल, असे कोणालाही वाटले नव्हते. कोंबाच्या वाढीवर वनस्पती शास्त्रज्ञांचे लक्षया विक्रम वीराने तीन कोंबांना जन्म दिल्याने भविष्यात याचे निश्चितच साक्षीदार होण्याची संधी आजच्या निवडुंग अभ्यासकांना मिळू शकते हा आशावाद असल्याने ते या नवीन आलेल्या कोंबाकडे त्या दृष्टीने पाहत आहेत. अनेक वनस्पती शास्त्रज्ञ त्यावर लक्ष ठेवून आहेत. सध्या हे तीन कोंब व त्यासमवेत हा ४७ फुटांचा लिमका बुक विक्रम वीर असे अत्यंत आगळेवेगळे व मनमोहक चित्र येथे पाहावयास मिळत आहे.⁠⁠⁠