ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - देशी मद्यावरील कररचनेत बदल होणार असल्याने राज्यात देशी दारू तसेच मसाल्याचे पदार्थ महागणार असून एलईडी बल्ब, पर्सेस, कॅन्सरवरील औषधे, वह्या, बेदाणे तसेच देशी या जीवनावश्यक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात ही घोषणा केली.
देशी दारुच्या उत्पादन शुल्कात २०० टक्के वाढ किंवा १२० रुपये प्रतिलीटर यापैकी जे जास्त असेल त्यात तेवढी वाढ होणार असल्याने देशी मद्य महागणार आहे तर एलईडी बल्बवरील करात कपात करून तो १२.५ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणल्याने बल्ब स्वस्त होणार आहे. याशिवाय कॅन्सरवरील औषधेही स्वस्त होणार असल्याने रुग्णांना तर प्रयोगशाळा वही,आलेख वही, चित्रकला वही, वही, आराखडा वही करमुक्त केल्याने त्याही स्वस्त होणार आहेत. याशिवाय हॅन्डबॅग्ज, देशी व व्हाईट खारी बटर, बेदाणे या वस्तूही स्वस्त होणार.