शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

परदेशात देशाची नालस्ती अयोग्यच

By admin | Updated: June 11, 2016 04:00 IST

पतंप्रधान परदेश दौऱ्यावर कोणत्या पक्षाचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे नेतृत्व करीत असतात; मात्र नरेंद्र मोदी यांना याचे भान राहिलेले दिसत नाही. ते जेव्हा परदेशात जातात, तेव्हा देशाची आणि काँग्रेस

मुंबई : पतंप्रधान परदेश दौऱ्यावर कोणत्या पक्षाचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे नेतृत्व करीत असतात; मात्र नरेंद्र मोदी यांना याचे भान राहिलेले दिसत नाही. ते जेव्हा परदेशात जातात, तेव्हा देशाची आणि काँग्रेस पक्षाची निंदानालस्ती करीत असतात. हे योग्य नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी मोदींना सुनावले. राष्ट्रवादीचा १७ वा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. ‘सोळावं वरीस धोक्याचं’ म्हणतात, पण आपल्या पक्षाचा आज १७ वा वर्धापन दिन आहे. त्यामुळे धोक्याचं सोळावं वरीस संपलेलं आहे, अशी मिश्कील सुरुवात करून पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, की केंद्र सरकार जाहिरातबाजी करीत सुटले आहे. पण दोन वर्षांत कृषी उत्पन्नात घट झाली, औद्योगिक उत्पादन घटले, बेरोजगारांची संख्या वाढली. सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. मराठवाडा होरपळताना, रेल्वेने पाणी नेण्याची वेळ आलेली असताना भाजपावाले त्यांचेच कौतुक करून घेत आहेत, हे योग्य नाही, असा टोला पवार यांनी लगावला. बराक ओबामा यांची कारकीर्द संपत आली आहे. गळाभेट घेण्यापलीकडे त्यांना काही काम उरलेले नाही. मोदींनी त्यांची भेट घेऊन काय मिळविले, असा सवालही त्यांनी केला. केंद्र आणि राज्य सरकारने आकसाने आपल्या नेत्यांना तुरुंगात टाकले, असे विधान पवारांनी छगन भुजबळ यांचा नामोल्लेख टाळून केले. कल्याण-डोंबविली पालिका निवडणुकीत उद्धव यांनी सरकारची लायकी काढली होती. त्याची आठवण करून देत उद्धव यांनी आता लायकी असणाऱ्यांसोबत राहावे, असा सल्ला त्यांनी दिला. मोदींनी परदेशात जाऊन जैतापूरसाठी करार केले. त्यामुळे आता विजेच्या बदल्यात अमेरिकी लोकांना आपल्या देशात नोकऱ्या मिळतील. त्यामुळे जैतापूरला प्रकल्प होऊ देणार नाही म्हणणारी शिवसेना आता गप्प का, असा सवाल पवार यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)जिल्ह्यांचे वाटपआगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते अरुण गुजराथी यांच्याकडे अमरावती, जीवनराव गोरे यांच्याकडे लातूर, आ. जितेंद्र आव्हाड नाशिक तर शशिकांत शिंदे यांच्याकडे वर्धा जिल्ह्याच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.