शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

देशातील पहिलाच टिकाव-फावड्याचा विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2017 04:00 IST

येथे सोमवारी (दि. २२) देशातील पहिला दोन निर्जीव वस्तूंचा विवाह सोहळा साजर झाला.

लोकमत न्यूज नेटवर्ककळस : येथे सोमवारी (दि. २२) देशातील पहिला दोन निर्जीव वस्तूंचा विवाह सोहळा साजर झाला. यामध्ये विजयीभव (टिकावराव) श्रीमंत पाणीदार जलसंधारण, कळसकर यांचे ज्येष्ठ सुपुत्र (ता. इंदापूर, जिल्हा पुणे) व भुवजचुडेमंडित (फावडेताई) श्रीमंत सुजलाम् सुफलाम् निरगुडेकर (रा. निरगुडे, ता. इंदापूर, जिल्हा पुणे) यांची ज्येष्ठ कन्या, हा देशातील आगळावेगळा ‘पाणी फाउंडेशन’ सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा- २०१७ श्रमदान लग्नसोहळा आज दोन्ही गावांच्या मान्यवरांच्या उपस्थित मोठ्या थाटामाटात सायंकाळी झाला.या वेळी दोन्ही गावचे वऱ्हाडी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी आहेर म्हणून झाडांच्या बिया व रोपे स्वीकारण्यात आली. हा लग्न समारंभ येथील गुरवाचा ओढा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. येथे मागील ४५ दिवसांपासून सुरू असलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस होता. पाणी फाउंडेशनची स्पर्धा सुरू झाल्यापासून लोकांचा सहभाग कमी असल्याने अपेक्षित काम झाले नाही. त्यामुळे कळसकर आणि निरगुडे या दोन गावांमध्ये एका टिकावापासून व एका फावड्यापासून सुरू झालेले काम भविष्यात श्रमदान, जलश्रमदान ही लोकचळवळ निर्माण व्हावी. म्हणून कळस येथे आगळा आणि वेगळा विवाह सोहळ्याचा कार्यक्रम झाला. या लग्नसोहळ्याच्या लग्नपत्रिकाही वाटण्यात आल्या होत्या. पुढच्या वर्षी करणार टिकावराव- फावडेतार्इंचा सामुदायिक विवाह... एक टिकाव व एक फावडे एकत्र आणले तर मोठ्या प्रमाणात काम होईल. आगामी काळात त्यांची संख्या ५० झाली तर पूर्ण गाव दुष्काळमुक्त व टँकरमुक्त होईल. त्यामुळे पुढच्या वर्षीदेखील यांचा सामुदायिक विवाह सोहळा करण्याचा निरगुडे व कळस गावाचा मनोदय आहे. कळस व निरगुडे या गावात श्रमदान व यांत्रिकीकरणाचे काम दुष्काळमुक्तीसाठी टाकलेले एक पाऊल. हा विवाह सोहळ्यातून एक संदेश देण्यात आला. सामाजिक विकासासाठी चळवळीचे रूपांतर लोकचळवळीत होण्यासाठी काही कालावधीची गरज असते. या चळवळीत स्वार्थी माणसे आली, की चळवळ नामशेष होते. नि:स्वार्थी माणसे एकत्र आली, की चळवळ हळूहळू जोमात वाढते.