विशाल सोनटक्के - उस्मानाबाद
अत्याधुनिक पद्धतीने जमीन मोजणीचा उस्मानाबाद जिलतील ‘सकनेवाडी पॅटर्न’ यापुढे राज्यभरात राबवून उपग्रहाच्या साने राज्यभरातील जमिनीची मोजणी करण्यात येईल, अशी घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केली. या उपक्रमासाठी 4 हजार कोटींपेक्षा जास्त खर्च येणार असून, त्यासाठी केंद्र शासनाने मदतीची तयारी दर्शविली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
जिलतील टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खडसे शनिवारी येथे आले होते. आढावा बैठकीपूर्वी खडसे यांच्या हस्ते तालुक्यातील सकनेवाडी येथे जमिनीची ई-मोजणी केलेल्या तसेच इतर प्रमाणपत्रंचे शेतक:यांना वाटप करण्यात आले. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. विविध उपक्रमांसाठी ग्रामस्थांना निधीचा वाटा भरावा लागतो.
मात्र सर्व गावांनी सहकार्य केल्यास जमा झालेल्या रकमेपैकी 25 टक्के निधी पुन्हा ग्रामपंचायतींना सार्वजनिक विकास कामांसाठी उपलब्ध करुन दिला जाईल, असे सांगत, युती शासनाच्या काळात राबविलेली वर्षातून एकदा शेतक:यांना सातबारा मोफत देण्याची योजना पुन्हा सुरु करण्यात येत असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
पूर्वी शेतीसाठी असणारी जमीन ही नंतर निवासी, उद्योग, जलसंधारण अशा कामांसाठी वापरली गेली. त्यामुळे कृषी क्षेत्र सातत्याने कमीकमी होत आहे. त्यामुळे राज्यात निश्चित शेतजमीन किती आहे, कोणत्या प्रयोजनासाठी किती जमीन गेली आहे, याची माहितीही या उपक्रमाच्या माध्यमातून मिळू शकणार असल्याचे ते म्हणाले.