शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

देशाला हिंदू राष्ट्र जाहीर करा !

By admin | Updated: October 23, 2015 04:18 IST

देशाची मान शाई टाकण्यामुळे नाही, तर दादरी हत्याकांडामुळे खाली गेली, असा टोला भाजपाला लगावतानाच गोमांसाची आवई उठवण्यापेक्षा देशाला हिंदू राष्ट्र जाहीर करा आणि समान नागरी

उद्धव यांचे मोदींना आव्हान : गाईवर नव्हे महागाईवर चर्चा करामुंबई : देशाची मान शाई टाकण्यामुळे नाही, तर दादरी हत्याकांडामुळे खाली गेली, असा टोला भाजपाला लगावतानाच गोमांसाची आवई उठवण्यापेक्षा देशाला हिंदू राष्ट्र जाहीर करा आणि समान नागरी कायदा लागू करा, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरुवारी ललकारले.शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील दसरा मेळावा शिवाजी पार्कवर झाला. त्या वेळी ठाकरे यांनी हिंदुत्व व महागाई या दोन प्रमुख मुद्द्यांवरून केंद्र व राज्य सरकारला धारेवर धरले. मात्र कुठल्याही परिस्थितीत सत्ता सोडणार नाही, असेही स्पष्ट केले. गाईवर नव्हे, तर महागाईवर चर्चा करा. राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार असताना पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्षे कसे स्थिर ठेवले होते. मग आताच ते का जमत नाही, असा सवाल ठाकरे यांनी केला. सत्तेत असताना महागाईवर लक्ष नसेल तर मी जनतेला तोंड दाखवू शकत नाही. इतका निर्लज्ज मी नाही. शिवसेना पाकिस्तानबद्दल बोलली तर भाजपाच्या पोटात का दुखते, असा प्रश्न ठाकरे यांनी केला. गर्वसे कहो हम हिंदू है, असे जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे आणि देवळातील घंटा बडवण्याचे नाही तर अतिरेक्यांना बडवणारे आहे, असा चिमटा ठाकरे यांनी संघ परिवाराला घेतला. ‘मंदिर वही बनायेंगे लेकीन तारीख नही बतायेंगे’ अशा शब्दांत भाजपाच्या फसलेल्या राम मंदिर आंदोलनाचा समाचार घेताना रामाने लंकेत घुसून जसा रावणाचा मुडदा पाडला तसा पाकचा पाडा, असा सल्ला त्यांनी दिला. मुफ्ती महंमद सईद जर तुम्हाला चालत असतील तर शिवसेनेचेही थोडे ऐका, असा टोलाही त्यांनी लगावला. मला वाद नको आहे. देशातील सरकार ही जनतेची शेवटची आशा आहे. ते सरकार नालायक ठरले तर देशाची काय अवस्था होईल ते मला माहित नाही, असे सांगत ठाकरे म्हणाले की, आम्ही टीका केली की लागलीच सत्तेतून कधी बाहेर पडणार हे विचारले जाते. सगळे चांगले झाले की आम्ही सत्तेतून बाहेर पडू. सत्तेत किती काळ राहायचे ते आम्हाला चांगले कळते. मात्र हे बजावत असतानाच ठाकरे यांनी विधानसभेवर भगवा फडकवून दाखवीन असेही जाहीर केले. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पाकिस्तानी कलाकार व क्रिकेटपटू यांना संरक्षण देण्याची जी भाषा केली त्याची खिल्ली उडवताना वेदात काय म्हटले आहे ते तुम्ही सांगा, पण आम्ही वेडात धावणारे मराठे आहोत, असे मत व्यक्त केले. (विशेष प्रतिनिधी)...तर इंदू मिलचे भूमिपूजन कशाला केले?हरियाणात भाजपाची सत्ता असतानाही दलित हत्याकांड घडले. त्यावर बोलताना केंद्रीयमंत्री व्ही. के. सिंग यांनी दलितांची तुलना कुत्र्याशी केली. दलितांबद्दल तुमच्या या भावना आहेत तर इंदू मिलचे भूमिपूजन कशाला केले? असली ढोंगं कशाला करता, असा सवाल ठाकरे यांनी केला.शरद पवारांनी स्वाभिमान शिकवू नयेशरद पवार यांचा समाचार घेताना शिवसेनाप्रमुख त्यांना काय म्हणायचे ते मी बोलू का, असा सवाल करीत मी सभ्यपणाच्या मर्यादा पाळतो. पण माझ्या तोंडून तो शब्द गेला तर बोलू नका, असे सांगत पवार यांनी स्वाभिमान शिकवू नये, असा टोला लगावला.