लातूर : येथील काँग्रेस कार्यकर्ती कल्पना गिरी खून खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने अॅड. उज्ज्वल निकम यांनी शुक्रवारी लातूरच्या जिल्हा न्यायालयात आपले वकीलपत्र सादर केले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस कार्यकर्ती कल्पना गिरी हिचा खून झाला होता. या प्रकरणी महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते विक्रमसिंह चव्हाण यांचे चिरंजीव व युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष महेंद्रसिंह चौहान याच्यासह समीर किल्लारीकर, श्रीरंग ठाकूर आणि प्रभाकर शेट्टी यांना अटक करण्यात आली होती. यात विक्रमसिंह चौहान आणि नगरसेवक कुलदीपसिंह ठाकूर हे फरार आहेत. या खटल्यात दोषारोपत्र निश्चितीसाठी शुक्रवारी न्यायालयात तारीख देण्यात आली होती. परंतु मुख्य आरोपीने या प्रकरणातील संबंध नसलेल्या आरोपींना वगळण्यासाठी डिस्चार्ज पिटीशन दाखल केले होते. सरकारच्या वतीने अॅड. उज्ज्वल निकम आणि आरोपीच्या वतीने अॅड. मोहन जाधव यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर अप्पर सत्र व जिल्हा न्यायाधीश एस.ए. सापटणेकर यांनी २७ जानेवारी ही तारीख दिली. (प्रतिनिधी)च्लातूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ती कल्पना गिरी हिचा खून करून मृतदेह तुळजापूर परिसरातील तलावाजवळ टाकण्यात आला होता.
कल्पना गिरी खून खटल्यात उज्ज्वल निकमांकडे वकीलपत्र
By admin | Updated: January 3, 2015 01:36 IST