शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बैठकीचेही नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

By admin | Updated: July 12, 2017 00:55 IST

प्रदेशाध्यक्षांच्या आदेशावरून शहराध्यक्षांनी आयोजित केलेल्या बैठकीला पक्षाच्या अवघ्या ५ नगरसेवकांनी हजेरी लावली.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : प्रदेशाध्यक्षांच्या आदेशावरून शहराध्यक्षांनी आयोजित केलेल्या बैठकीला पक्षाच्या अवघ्या ५ नगरसेवकांनी हजेरी लावली. उर्वरित पदाधिकाऱ्यांमधीलही अनेक जण अनुपस्थित होते. त्यामुळे या बैठकीत मंथन होऊन पक्षाला संजीवनी मिळेल, नेते, पदाधिकाऱ्यांना पक्षाकडे लक्ष देण्याविषयी समज दिली जाईल अशी नव्या-जुन्या काँग्रेसजनांची अपेक्षा फोल ठरली. उलट पक्षबैठकीचे गांभीर्यच नेते, पदाधिकाऱ्यांना नसल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.शहराच्या राजकीय पटलावर काँग्रेसचे अस्तित्व दिवसेंदिवस क्षीण होत चालले आहे. त्यामुळे दुसऱ्या- तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांमध्ये गेली अनेक दिवस चलबिचल सुरू आहे. काहींनी तर थेट दुसऱ्या राजकीय पक्षाची वाट धरली आहे. काँग्रेसमध्ये यायला मात्र कोणीही तयार नाही. महापालिकेच्या निवडणुकीत त्यामुळे नगरसेवकांची संख्या २९वरून थेट ९ वर आली. त्यानंतर तर पक्षाची स्थिती अधिकच गंभीर झाली आहे व तरीही नेते, पदाधिकारी स्वहित साधण्यातच मग्न आहेत. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशाने शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी शहर काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी काँग्रेस भवन येथे आयोजित केली होती. पक्षाच्या सर्व नगरसेवकांनाही यासाठी बोलवण्यात आले होते. शहराध्यक्ष रमेश बागवे, महापालिकेतील पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे, नगरसेवक आबा बागुल, अविनाश बागवे, रफिक शेख, सुजाता शेट्टी, पुरस्कृत नगरसेवक रवींद्र धंगेकर, स्वीकृत नगरसेवक अजित दरेकर, माजी उपमहापौर कमल व्यवहारे एवढीच वरिष्ठ मंडळी या बैठकीला उपस्थित होते. पक्षाच्या निवडून आलेल्या ९ नगरसेवकांपैकी फक्त ५ नगरसेवक उपस्थित होते. अन्य बहुतेक हजेरी ही विविध आघाड्यांचे प्रमुख तसेच युवक शाखेच्या पदाधिकाऱ्यांचीच होती.अरविंद शिंदे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी ठरलेल्या मुद्द्यांची चर्चा संपल्यानंतर लगेचच निघून जाणे पसंत केले. पी. चिदंबरम यांच्यासमवेत शहरातील व्यापाऱ्यांची जीएसटी या नव्या करप्रणालीसंदर्भात बैठक आयोजित करण्याचे ठरले. ठिकाण नंतर निश्चित करण्यात येणार आहे. काही पदाधिकारी निघून गेल्यानंतर बैठक संपवण्यातच आली. >अन्य विषय उपस्थित न करण्याची तंबीबैठकीच्या सुरूवातीलाच शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी पक्षाची स्थिती खराब आहे यासाठी बैठक आयोजित केल्याचा मुद्दा खोडून काढत तसे काही नसल्याचे स्पष्ट केले . त्यासाठी म्हणूनच उपस्थित असलेल्यांची हवा काढून घेतली. बैठकीत केवळ बूथ कमिट्या, केंद्रीय शाखेने दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त करण्यासाठी दिलेले कार्यक्रम, २२ जुलैला माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा होणारा पुणे दौरा या मुद्द्यापुरतीच बैठक मर्यादीत राहिल, त्याशिवाय अन्य विषय कोणी उपस्थित करू नये अशी तंबीच अध्यक्षांनी उपस्थितांना दिली.मुळातच उपस्थिती कमी व त्यातही थेट अध्यक्षांनीच बैठकीत चर्चा करायचे मुद्देच दिल्यामुळे उपस्थितांपाकी अनेकांचा बैठकीतील रसच निघून गेला. तरीही एका पदाधिकाऱ्याने सर्वोच्च न्यायालयाने हमरस्त्यापासून ५०० मीटर अंतरापर्यंत केलेल्या मद्यबंदीबाबत पक्षाचे काय मत आहे असे विचारून बैठकीत गोंधळ माजवला. अरविंद शिंदे यांनी न्यायालयाच्या निर्णयावर पक्ष काय बोलणार अशी विचारणा त्यांना केली, मात्र अन्य पक्ष यावर बोलत आहे, काँग्रेसकडून मात्र काहीच प्रतिक्रिया नाही.