शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी नगरसेवकाची अरेरावी

By admin | Updated: June 13, 2016 23:28 IST

लातूर : टँकरच्या पाण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्तीला अरेरावीची भाषा वापरत पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याबाबत अपशब्द वापरून शिवीगाळ करणाऱ्या नगरसेवक श्रीदेवी औसे व त्यांचे

लातूर : टँकरच्या पाण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्तीला अरेरावीची भाषा वापरत पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याबाबत अपशब्द वापरून शिवीगाळ करणाऱ्या नगरसेवक श्रीदेवी औसे व त्यांचे पती शिवा औसे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी काँग्रेस नगरसेविका श्रीदेवी औसे यांच्या घरावर भाजपाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करीत निषेध केला़ नगरसेविका श्रीदेवी औसे व त्या कार्यकर्तीमध्ये झालेल्या संभाषणाचा आॅडिओ क्लीप सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे़ नगरसेवकाच्या मनमानीमुळे सर्वसामान्य नागरिकांना पाणी मिळणे अशक्य झाले आहे़ प्रभाग क्ऱ २१ मधील काही महिलांनी पाणी मिळत नसल्याची तक्रार करण्यासाठी नगरसेविका श्रीदेवी औसे यांचे घर गाठले़ मात्र, नगरसेविका औसे यांच्या पतींनी पाणी मिळत नसल्याची तक्रार पालकमंत्र्यांकडे केली तरी आम्हाला काही फरक पडत नाही़ पाणी पाहिजे असेल तर पंकजा मुंडेकडेच जा, इथले आम्ही सरकार आहोत, असे म्हणत अपशब्द काढले़ भाडेकरूंनी आमच्यासोबत बोलू नये, घरमालक आणि आम्ही बघून घेऊ असे सांगत महिलांना धमकावल्याचे निवदेनात म्हटले आहे़ महिलांना अपशब्द काढून अपमान करणे, धमकी देणे याबाबत श्रीदेवी औसे व त्यांच्या पतीविरूध्द गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे़ भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव स्वाती जाधव यांच्या नेतृत्वात नगरसेविका श्रीदेवी औसे यांच्या घरासमोर निदर्शने करण्यात आली़ यावेळी विवेक बाजपाई, राहुल कावळे, सुनिल मलवाड, शिवा शिसोदिया, सुवर्णा येलाले आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)