शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

कौन्सिल जनरलांची डेक्कन ओडिसी जाणार विदर्भात

By admin | Updated: June 24, 2016 05:27 IST

नागपूरचा महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्प आणि विदर्भातील पर्यटनाला चालना देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विविध देशांच्या वाणिज्य दूतांना (कौन्सिल जनरल्स) ‘डेक्कन ओडिसी

मुंबई : नागपूरचा महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्प आणि विदर्भातील पर्यटनाला चालना देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विविध देशांच्या वाणिज्य दूतांना (कौन्सिल जनरल्स) ‘डेक्कन ओडिसी’ या अलिशान रेल्वेगाडीने नेणार आहेत. या कौन्सिल जनरल्सची एक बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर आज झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. हे कौन्सिल जनरल्स’ नागपुरात येतील त्या दिवशी विदर्भातील गुंतवणुकीच्या दृष्टीने ‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ’ सारखे भव्य प्रदर्शन आयोजित करण्याचा मानसही मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीत व्यक्त केला. औद्योगिक गुंतवणूक आणि पर्यटनक्षेत्रात गुंतवणुकीला विदर्भात प्रचंड वाव असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आजच्या बैठकीत मिहानच्या विकासाबाबतचे सादरीकरण एमएडीसीचे व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील यांनी तर आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबतचे सादरीकरण एमएडीसीच्या अधिकाऱ्यांनी केले. नागपुरातील प्रस्तावित आॅरेंज सिटी स्ट्रिट या संकल्पनेचे तसेच, नाग नदी सौंदर्यीकरणाबाबतचे सादरीकरण श्रावण हर्डीकर यांनी केले. नागपुरात पूर्वी अंबाझरी आॅर्डनन्स फॅक्टरीपर्यंत जाणाऱ्या रेल्वेलाईनची जागा महापालिकेच्या ताब्यात असून या ३८ एकरच्या पट्टयात आॅरेंज सिटी स्ट्रिट योजना राबविली जाणार आहे. तिची उभारणी खासगीकरणातून केली जाईल. या पट्टयामध्ये व्यावसायिक संकुले, निवासी इमारती, परवडणारी घरे, मनोरंजन पार्क, इस्पितळ, हॉटेल्स, शैक्षणिक संकुले आदींची उभारणी करण्यात येणार आहे. नागनदीची स्वच्छता आणि सौंदर्यीकरणाचा १४०० कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. शहराच्या मधोमध वाहणाऱ्या या नदीची आज बकाल अवस्था आहे. ेआता या नदीच्या १७ किलोमीटर लांबीच्या पट्टयाचे सौंदर्यीकरण करण्यात येईल. (प्रतिनिधी)