शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कापूस उत्पादकांचे पाच हजार कोटी बोंडअळीने खाल्ले

By अतुल कुलकर्णी | Updated: December 8, 2017 03:48 IST

गुलाबी बोंडअळीने कापसाचे पीक फस्त केल्याने बीटी कॉटन बियाणे आणि कीटकनाशकांवर कापूस उत्पादक शेतकºयांनी खर्च केलेले सुमारे पाच हजार कोटी रुपये पाण्यात गेले आहेत.

मुंबई : गुलाबी बोंडअळीने कापसाचे पीक फस्त केल्याने बीटी कॉटन बियाणे आणि कीटकनाशकांवर कापूस उत्पादक शेतकºयांनी खर्च केलेले सुमारे पाच हजार कोटी रुपये पाण्यात गेले आहेत.यंदा ४२.०६ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. पैकी ९५ टक्के क्षेत्र बीटी कापसाच्या पिकाखाली आहे. यासाठी १ कोटी ६५ लाख बीटी कापसाच्या बियाणांची पाकिटे वापरली गेली. एका पाकिटाची किंमत ७५० रुपये लक्षात घेता फक्त बियाणांवर शेतकºयांचे १२३७ कोटी ३० लाख रुपये खर्च झाले. तर सुमारे साडेतीन हजार कोटी रुपये रासायनिक औषधे व खतांवर खर्च केले गेले आहेत.सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ कॉटन रिसर्च या केंद्रीय संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. के.आर. क्रांथी यांच्या समितीने डिसेंबर २०१५ मध्येच विविध राज्यांतल्या कापसाच्या पिकाचा अभ्यास करून बीटी कॉटनचे बियाणे बोंडअळीला बळी पडू नये यासाठी काही उपाय सुचवले होते. मात्र त्यावर केंद्र सरकारने ठोस पावले उचलली नाहीत.विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही ६ जुलै रोजी राज्य सरकारला पत्र लिहून वेळीच उपाय करा, असे कळवले. मात्र सरकारने दखल घेतली नाही. परिणामी ९५ टक्के कापसाचे पीक बोंडअळीच्या तडाख्यात सापडले.बोंडअळी दाद देत नाही हे पाहून शेतकºयांनी दोन-तीन रासायनिक औषधांचे मिश्रण करून फवारणी केली. त्यात काही शेतकºयांचे जीवही गेले. मात्र हजारो कोटींचा व्यवहार करणाºया कंपन्यांचे मिंधे झालेल्या अधिकाºयांनी आणि प्रशासनाने कोणतीही प्रभावी जनजागृती केली नाही, असा गंभीर आरोप मुंडे यांनी केला आहे.केंद्र शासनाने बीटी तंत्रज्ञानाचे व्यापारीकरण करण्यासाठी बियाणे उत्पादकांना बी.जी. २ तंत्रज्ञानावर आधारित बियाणे उत्पादनाची परवानगी दिली असून यात ‘ट्रान्सजेनिक जिन्स’ असल्याने बोंडअळीला प्रतिकार करणारे आहे, असा खुलासा कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार यांनी केला आहे. मात्र या बियाणांची प्रतिकारशक्ती कशी कमी झाली, हे त्यांनी सांगितले नाही.तुम्ही सरसकट पद्धतीने २० रोपे निवडा, त्यात अळी दिसली तर फवारणी करा, असे अत्यंत बारीक अक्षरात बी.टी. बियाणे कंपन्यांनी माहिती पत्रकात छापलेले असते. मात्र हे कोणी शेतकºयांना सांगत नाही. ही सगळी कंपन्यांची आणि अधिकाºयांची बदमाशी आहे. तंत्रज्ञानात शेतकºयांचा अभिमन्यू करून त्याला आणखी गाळात घातले जात आहे. - विजय जावंधिया, शेतीतज्ज्ञ