शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कापसाला बोनस नाही, हरब-याचे दर घसरले

By admin | Updated: January 30, 2016 02:14 IST

हातात पैसे नसल्याने शेतक-यांची तारांबळ!

अकोला : पावसाच्या अनिश्‍चिततेमुळे सलग दहा वर्षापासून सरासरी उत्पादन घटल्याने शेतकर्‍यांच्या हातात पैसाच शिल्लक नाही. अशा स्थितीत शासनाने घोषणेप्रमाणे कापसाला अग्रीम बोनस दिला नसून, दुसरीकडे बाजारात सोयबीन,तुर, मुग व हरबर्‍याचे दरही कोसळल्याने शेतकरी हतबल झाला आहे. विदर्भातील कृषी विकासाचा दर गत बारा वर्षांपासून शून्य टक्कयावरच आहे. भरीस भर नैसर्गिक आपत्ती, भूमी अधिग्रहण आणि शेतमालाच्या घसरलेल्या दरामुळे या विकास दरात घसरणच सुरू असल्याने विदर्भातील शेतकरी खचला आहे. मागील दहा वर्षाचा कृषी विकासाचा दर कमी-अधिक स्वरू पात असल्याचा निष्कर्ष आहे. त्याचे गंभीर परिणाम विदर्भातील शेतकर्‍यांना सोसावे लागत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. गत पाच वर्षांत शेतकर्‍यांच्या परिस्थितीत तसूभरही सुधारणा झाली नसून, नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढले आहे. विदर्भातील पावसाचे प्रमाण असमान असल्याने गेल्या दहा वर्षांत उत्पन्न घटले आहे. शेतकर्‍यांना नफ्याऐवजी तोटाच झाल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. अतवृष्टी, दुष्काळ यामुळे सरासरी उत्पादन घसरले आहे. यावर्षी सोयाबीन आणि कापसाचे हेक्टरी उत्पादनही घटले आहे. त्यामुळे यावर्षी तरी कापसाला अग्रीम बोनस मिळेल अशी शेतकर्‍यांना अपेक्षा होती; पण अद्याप शासनाने याबाबतीत कोणताच निर्णय घेतला नसून, बाजारात सोयाबीन, तुरीचे दर पडल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. परिणामी शेतकर्‍यांच्या हातात पैसाच शिल्लक नसून, कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुला-मुलींचे लग्न या सर्वामुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढत असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. यावर्षी ही परिस्थितीची आणखी भीषण झाली आहे. यावर्षी शेतकर्‍यांना मशागतीला पैसा लागणार आहे; पण शेतकर्‍यांकडे पैसाच नाही. त्यामुळे शेतकरी सावकार, बँकांच्या पायर्‍या झिजवताना दिसत आहेत.थकीत कर्जाच्या वसुलीचा तगादा शासनाने यावर्षी कोणतेही कर्ज वसूल करू नये आणि कर्जाचे पाच वर्षासाठी पुर्नगठण केल्याने शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे; पण काही बँकांनी थकीत कर्जासाठी वसुलीसाठी तगादा लावला आहे. यात जिल्हा बँकांचाही समावेश आहे.हरब-याचे दर झाले कमीविक्री हंगाम सुरू होताच हरबर्‍याचे दर ४,६00 रू पये प्रतिक्विंटल होते ते दर आजमितीतीस ४१00 ते ४२00 रू पयावर आले. सोयाबीन व तुरीच्या दरात चढउतार आहे.